स्वयंसेवक ते पंतप्रधान… कसा होता नरेंद्र दामोदरदास मोदींचा ७४ वर्षांचा प्रवास?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वयाची ७४ वर्षे पूर्ण करत ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत

स्वयंसेवक ते पंतप्रधान… कसा होता नरेंद्र दामोदरदास मोदींचा ७४ वर्षांचा प्रवास?

भारताचे पंतप्रधान आणि विश्व नेते अशी स्वतःची खास ओळख बनवणारे नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा आज (१७ सप्टेंबर) वाढदिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वयाची ७४ वर्षे पूर्ण करत ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा…

नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास सुरू झाला उत्तर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या छोट्याशा शहरातून. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन वर्षांनी १७ सप्टेंबर १९५० रोजी त्यांचा जन्म झाला. त्यामुळेच स्वतंत्र भारतात जन्मलेले आणि पंतप्रधान पदी बसलेले नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. नरेंद्र मोदी हे दामोदरदास मोदी आणि हिराबा मोदी यांचे तिसरे अपत्य आहेत. घरची हालाकीची परिस्थिती, मोदींचे वडील दामोदरदास मोदी हे त्यावेळी वडनगरच्या रेल्वे स्टेशनवर चहा विकण्याचे काम करत होते. आपल्या वडिलांना मदत म्हणून नरेंद्र मोदीही सकाळी वडिलांना मदत करण्यासाठी स्टेशन गाठत असत.

वयाच्या १७ व्या वर्षी भारतभर प्रवास करण्यासाठी नरेंद्र मोदींनी घर सोडले. दोन वर्षे त्यांनी भारतभर प्रवास केला. यातूनच त्यांना त्यांच्या आयुष्याचे ध्येय सापडले. पुढे ते अहमदाबादला गेले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) सामील झाले. १९७२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवकात रुजू झाल्यानंतर ते स्वयंसेवक म्हणून काम करू लागले. १९७८ मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेत संघाने त्यांना वडोदरा येथे विभाग प्रचारक म्हणून जबाबदारी दिली. पुढे ते आपल्या कामाचा ठसा उमटवत राहिले. १९८० मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना दक्षिण गुजरात आणि सुरत विभागासाठी प्रचारक म्हणून जबाबदारी दिली. १९८७ मध्ये भाजपाचे सदस्य झाल्यानंतर त्यांना गुजरात युनिटचे सरचिटणीस बनवण्यात आले. पुढे त्यांनी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सुरू केलेल्या न्याय रथयात्रेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान, गुजरातमध्ये १९९० मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यात भाजपाला उत्तम यश मिळाले. ७ ऑक्टोबर २००१ रोजी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. २२ मे २०१४ पर्यंत त्यांनी हे पद भूषवले. गुजरातचे मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर ते भारताचे पंतप्रधान झाले. यानंतर त्यांनी २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी भारताचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पुढे त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने इतिहास रचत २०१९ मध्ये मोठ्या बहुमताने विजय मिळवून नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. पुढे उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर ते सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आणि २०२४ साली नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

हे ही वाचा:

अल्पसंख्यांकांवरून भारतावर टिपण्णी करण्यापूर्वी इराणने स्वतःचे रेकॉर्ड्स बघावेत

मुंबईत गणपती विसर्जनासाठी २५ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

कल्पेश दवे आता स्टार हाऊसिंग फायनान्सचे कार्यकारी संचालक

भारताच्या पहिल्या ‘वंदे भारत मेट्रो’चे उद्घाटन, ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ नावाने ओळख !

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीच स्वतःच्या आधी देशाला ठेवले. भारताला विकसित करण्यासाठी आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने नवनवे निर्णय घेत अनेक नियम, कायदे लागू केले. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, डिजिटल इंडिया, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, भारत मिशन, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री जन धन योजना, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत अशा अनेक योजनांनी आणि उपक्रमांनी देशाच्या विकासाची दिशा बदलली आहे. तर, दुसरीकडे नागरिकत्व सुधारणा कायदा, कलम ३७० हटवणे, तिहेरी तलाक रद्द, सर्जिकल स्ट्राईक अशी अनेक ऐतिहासिक पावलेही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने उचलली. आंतरराष्ट्रीय राजकारणातही नरेंद्र मोदींचा लौकिक आहे. जागतिक नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय राजकारण्यांपैकी एक आहेत.

Exit mobile version