भारतीय युद्धनौका रशियन परेडमध्ये सामील, पुतीन यांनी मानले आभार !

भारतीय खलाशांनीही पुतीन यांचे केले स्वागत

भारतीय युद्धनौका रशियन परेडमध्ये सामील, पुतीन यांनी मानले आभार !

भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस (INS) ताबरनेही यंदाच्या रशियाच्या नौदल दिन परेडमध्ये भाग घेतला होता. यावेळी परेडचे निरीक्षण करताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतीय युद्धनौका आणि भारतीय नौसैनिकांचे आभार मानले. आयएनएस ताबरसमोरून जात असताना पुतिन म्हणाले, रशियन नौदल दिनात सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. यावेळी युद्धनौकेच्या डेकवर उभ्या असलेल्या भारतीय खलाशांनीही पुतीन यांचे जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, आयएनएस ताबरची निर्मिती रशियामध्येच झाली होती, जी २००४ मध्ये भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २८ जुलै रोजी सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित नौदल दिनाच्या परेडमध्ये बोलताना म्हटले की, राष्ट्रीय सुरक्षेत नौदल महत्त्वाची भूमिका बजावते. यादरम्यान पुतिन यांनी देशाच्या नौदलाला बळकटी देण्याबाबत चर्चा केली. ते म्हणाले, ‘आम्ही भूपृष्ठ, पाणबुडी दल आणि नौदल विमान वाहतूक बळकट करत राहू. यासोबतच नौदलाची जहाजे अतिशय अचूक हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असतील.

हे ही वाचा :

खारघरमध्ये गोळीबार करत दागिन्यांच्या दुकानात दरोडा; लाखोंचे दागिने लुटले !

दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेनंतर नियमांचे उल्लंघन करणारे १३ कोचिंग सेंटर्स सील

मुंबईत पुन्हा हिट अँड रन प्रकरण; बीएमडब्लूच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

भारतीय नेमबाजांची कमाल, रमिता नंतर अर्जुनही अंतिम फेरीत !

दरम्यान, रशियन परेडमध्ये समाविष्ट झाली ‘INS Tabar’ ही युद्धनौका रशियाने बनवली होती. ही युद्धनौका १९ एप्रिल २००४ रोजी भारतीय नौदलात सामील झाली. सध्या आयएनएस ताबरचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन महेश मांगीपुडी आहेत. हे जहाज मुंबई बंदरात तैनात करण्यात आले आहे. याशिवाय आयएनएस तलवार आणि आयएनएस त्रिशूलही मुंबई बंदरावर तैनात आहेत.

Exit mobile version