पर्यावरणासाठी उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘विवेकानंद सस्टेनेबिलिटी पुरस्कार’

पर्यावरणासाठी उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘विवेकानंद सस्टेनेबिलिटी पुरस्कार’

पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला ‘विवेकानंद सस्टेनेबिलिटी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. पर्यावरणाच्या वचनबद्धतेसाठीचा जीवनगौरव पुरस्कार आणि पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी काम करणारी महिला अशा दोन व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

स्वच्छ पाणी आणि स्वच्छता सुधारणा, शेतकऱ्यांच्या उत्पादनात सातत्यपूर्ण सुधारणा, शेतकरी उत्पन्न आणि शाश्वत शेती पद्धती, वैज्ञानिक उपक्रमाद्वारे पर्यावरणाच्या शाश्वततेमध्ये योगदान देणाऱ्या नवीन साहित्याचा विकास, क्लीन एनर्जी प्रकल्प, सागरी जीवन, जंगलांमधील जीवन, भू जीवनमधील जैवविविधता सुधारणे, हवामान प्रभाव कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर, शाश्वत सामाजिक बदल घडवून आणणार्‍या समुदायांमध्ये कार्य आदी क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

हा पुरस्कार वैयक्तिक किंवा संस्थेला दिला जाणार आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये भारतात राहून किंवा परदेशात राहून भारताच्या पर्यावरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्याला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

आजपासून दहावीची परीक्षा; तासभर आधी उपस्थित राहा

चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणारा ‘द काश्मीर फाइल्स’ लवकरच या ओटीटी प्लॅटफॉर्मवर

डहाणू महोत्सवाने दिला स्थानिकांना आर्थिक हातभार

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला!

vsawards2022@gmail.com या ईमेल वर अर्ज पाठवता येणार असून अर्ज प्राप्त झाल्यावर सर्व अर्जांमधून कामाचा आढावा घेतला जाणार आहे. कामचा कालावधी, परिणाम, कार्य पद्धती याकडेही लक्ष दिले जाणार आहे. त्यानंतर निवड झालेल्यांना एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात व्यक्तीला ‘विवेकानंद सस्टेनेबिलिटी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.

Exit mobile version