मुंबईच्या पोलीसआयुक्तपदी विवेक फणसळकर यांची नियुक्त झाली आहे. संजय पांडे यांचा कार्यकाळ संपला असल्याने विवेक फणसळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी निवड झाली आहे. गुरुवार, ३० जून रोजी म्हणजेच आज संजय पांडे निवृत्त होणार आहे. त्यांनतर विवेक फणसळकर हे संजय पांडे यांची जागा घेणार आहेत.
Maharashtra Government appoints senior IPS officer Vivek Phansalkar as the Mumbai Police Commissioner. Outgoing CP Sanjay Pandey is scheduled to retire tomorrow.
— ANI (@ANI) June 29, 2022
२०१८ मध्ये, विवेक फणसळकर यांची परमबीर सिंग यांच्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ज्यांची नंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली होती. ठाण्यातील त्यांची उत्तम कामगिरी पाहता राज्य शासनाने त्यांची बदली न करता मुदतवाढ केली होती. या नियुक्तीपूर्वी, फणसळकर हे २०१६ पासून मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक होते. पावणे दोन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळला होता.
हे ही वाचा:
कुलगाममध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
उद्धव ठाकरे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द; बहुमत चाचणीची आता गरज नाही
‘उद्यापासून मी शिवसेना भवनात बसणार’
विवेक फणसळकर हे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकात अतिरिक्त महासंचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली आहे. आणि त्यापाठोपाठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदीही ते होते. कडक शिस्त आणि प्रामाणिकपणा या त्यांच्या गुणांमुळे ते खात्यात ओळखले जातात.