विवान कारुळकरच्या ‘सनातन धर्म’ पुस्तकावर मान्यवरांचा कौतुकवर्षाव

१६व्या वर्षी लिहिले सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस हे पुस्तक

विवान कारुळकरच्या ‘सनातन धर्म’ पुस्तकावर मान्यवरांचा कौतुकवर्षाव

प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर आणि प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांचे सुपुत्र विवान कारुळकरने लिहिलेल्या सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस या पुस्तकाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले असून अवघ्या १६व्या वर्षी हे पुस्तक लिहून सनातन धर्माचा प्रसार-प्रचार करत असल्याबद्दल शाबासकीही दिली आहे.

वेदांमध्ये जे लिहिले आहे ते आजचे विज्ञान आहे, असा मतितार्थ या पुस्तकातून विवानने मांडला आहे. विज्ञान आणि सनातन धर्म यांचा संबंध नाही असा दुष्प्रचार करणाऱ्यांना विवानने आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे तसेच नवी पिढी विज्ञानाबरोबरच भारतीय संस्कृती, परंपरा याकडेही सकारात्मक पद्धतीने पाहते हेदेखील त्याने आपल्या या लेखनाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना राजभवन येथे या पुस्तकाची प्रत विवानने सहकुटुंब प्रदान केली तेव्हा राज्यपालांनी विवानच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आणि हाच नवा भारत असल्याची प्रतिक्रियाही दिली.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष चौहान यांनाही या पुस्तकाची प्रत प्रदान केली तेव्हा त्यांनी विवानशी पुस्तकावर चर्चा केली . वेळात वेळ काढून त्यांनी पुस्तक चाळले, त्यावर आपली स्वाक्षरी देऊन पुस्तक आवडल्याच अभिप्रायही कळवला.

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल यांनीही विवानचे या पुस्तकाबद्दल तोंडभरून कौतुक केले.जैन धर्माचे आचार्य महाश्रमणजी यांनीही पुस्तक पाहून विवानला भरपूर आशीर्वाद दिले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी तसेच माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनाही या पुस्तकाची प्रत प्रदान करण्यात आली. त्यांनीही विवानला शाबासकीची थाप दिली. डीमार्टचे संस्थापक आणि कार्याध्यक्ष राधाकिशन दमाणी यांनीही या पुस्तकाचे कौतुक केले. त्यांनी अत्यंत मनःपूर्वक ही प्रत न्याहाळली. इंडिया ग्लोबल फोरमच्या मंचावरही विवानच्या पुस्तकाने ठसा उमटविला. रिलायन्स इंडस्ट्रीचे महेंद्र पटेल, आयजीएफचे संस्थापक व कार्याध्यक्ष मनोज लडवा यांनीही पुस्तकाची प्रशंसा केली.

हे ही वाचा:

सीएएला राज्यांचा विरोध निरुपयोगी; प्रक्रियेचा राज्यांशी संबंध कमी !

कोल्हापूर: लसीचा कोर्स पूर्ण केल्यानंतरही महिलेचा रेबीजने मृत्यू!

शाहजहान शेखचा शाळा सोडल्याचा दाखला बांगलादेशचा!

शाहजहान शेखचा शाळा सोडल्याचा दाखला बांगलादेशचा!

भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबईचे प्रभारी अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, सुशील कुल्हारी, राजस्थानचे आयकर खात्याचे प्रिन्सिपल डायरेक्टर सुधांशू शेखर झा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, मुंबई महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त प्रवीण परदेशी, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जितो संघटनेचे प.पू. गुरुदेव नयपद्मसागरजी, कस्टम विभागाचे आयुक्त अस्लम हसन, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे खासगी सचिव एस. के. जाधव  यांनीही विवानच्या या प्रयत्नाबद्दल त्याला शाबासकीची थाप दिली.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मंचावरही विवानने लिहिलेल्या या पुस्तकाचे कौतुक केले गेले आणि त्याला त्यासाठी सन्मानित करण्यात आले.

वाराणसीतील काशी विश्वेश्वर मंदिर, शनिशिंगणापूरच्या शनैश्वरा मंदिरात विवानचे हे पुस्तक सादर करून कृपाशीर्वाद घेण्यात आले.

Exit mobile version