विवान कारुळकरचा ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे सन्मानचिन्ह देऊन गौरव

द सनातन धर्म...पुस्तकाचे कॅबिनेट मंत्री गारेथ थॉमस यांनी केले कौतुक

विवान कारुळकरचा ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे सन्मानचिन्ह देऊन गौरव

विवान कारुळकरने लिहिलेल्या द सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस तसेच द सनातन धर्म : ट्रू सोर्सेस ऑफ ऑल टेक्नॉलॉजीस या पुस्तकांचे कौतुक सर्वत्र होत असून आता ब्रिटनच्या संसदेचे सदस्य आणि कॅबिनेट मंत्री गारेथ थॉमस यांनी विवानच्या या प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले आहे.

गारेथ थॉमस हे निर्यात, व्यवसाय आणि सेवा खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी विवानच्या लिखाणाची प्रशंसा करताना त्याला सन्मानचिन्ह व बॅच देऊन त्याचा गौरव केला आहे. हाऊस ऑफ कॉमन्सचे हे सन्मानचिन्ह आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे.

सध्या विवान हा लंडनमध्ये असून त्याचे वडील तसेच प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर आणि त्याची आई कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर हेदेखील त्याच्यासोबत आहेत. त्यांच्या उपस्थितीत विवानला हा सन्मान प्रदान करण्यात आला.

हे ही वाचा:

सौदी अरेबियाने भारतासह १४ देशांच्या व्हिसावर घातली बंदी; कारण काय?

एलपीजी सिलेंडर ५० रुपयांनी महागले!

मुलीला रस्त्यात छेडले, कर्नाटकचे गृहमंत्री म्हणतात, अशा घटना घडत असतात!

“टीम इंडियातून बाहेर – पण आयपीएलमध्ये फायर!”

प्रशांत कारुळकर यांनी या गौरवाबद्दल ब्रिटन सरकारचे आभार मानले असून असा सन्मान स्वीकारणारा विवान हा वयाने सर्वात लहान असा गौरवमूर्ती ठरला आहे. प्रशांत कारुळकर यांनी याबाबत हरीभाई आणि रंगभाई यांचे आभार मानले आहेत.

 

विवानने वयाच्या १६व्या वर्षी हे पुस्तक लिहिले असून लहान वयात त्याने केलेल्या या संशोधनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या पुस्तकाच्या तीन वेगवेगळ्या भाषांतील आवृत्त्या निघाल्या आहेत. आता तंत्रज्ञानावरही त्याचे इंग्रजीतील पुस्तक उपलब्ध आहे.

विवानच्या पुस्तकाचे देशभरात तसेच विदेशातही खूप कौतुक झाले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विवानच्या या पुस्तकाचे कौतुक केले असून त्याला प्रोत्साहन दिले आहे.

वेदांमध्ये जे लिहिले आहे ते आजचे विज्ञान आहे, असा मतितार्थ या पुस्तकातून विवानने मांडला आहे. विज्ञान आणि सनातन धर्म यांचा संबंध नाही असा दुष्प्रचार करणाऱ्यांना विवानने आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे तसेच नवी पिढी विज्ञानाबरोबरच भारतीय संस्कृती, परंपरा याकडेही सकारात्मक पद्धतीने पाहते हेदेखील त्याने आपल्या या लेखनाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.

Exit mobile version