28 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषदुबईत मुसळधार पावसाने पूरस्थिती; गाड्या, बस रस्त्यांवर अडकल्या!

दुबईत मुसळधार पावसाने पूरस्थिती; गाड्या, बस रस्त्यांवर अडकल्या!

विमानांची सेवाही विस्कळीत

Google News Follow

Related

दुबईत मुसळधार पाऊस पडल्याने पूरस्थिती उद्भवली असून रस्त्यावर सर्व वाहने अडकली आहेत. तसेच, विपरित हवामानाच्या परिस्थितीमुळे विमानांची सेवाही विस्कळीत झाली आहे.शहरात पुरामुळे मोठे महामार्ग पाण्याखाली गेले असून रस्ते आणि पूल बंद झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये गाडी पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जगातील सर्वात व्यग्र विमानतळांपैकी एक मानला जातो. मात्र बिकट हवामानामुळे येथील विमानसेवेवर परिणाम झाला आहे. पाण्याने भरलेल्या धावपट्ट्यांवर विमाने असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मंगळवारी विमानतळावरील वाहतूक २५ मिनिटांसाठी थांबवण्यात आली होती. प्रतिकूल हवामानाची परिस्थिती कायम असल्याने, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने तात्पुरती येणारी उड्डाणे वळवली.

हे ही वाचा:

सन २०३०पर्यंत भारत कचरामुक्त अंतराळ मोहिमा करणार!

ओपिनियन पोलनुसार लोकसभा निवडणुकीत नऊहून अधिक राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ होणार

रामनवमी: रावणाच्या अत्याचारातून मुक्तीसाठी भगवान विष्णूंचा सातवा अवतार

जर्मनीत ईव्हीएम वापरत नाहीत म्हणून भारतात का वापरू नये?

देशातील असामान्य हवामानामुळे शॉपिंग सेंटर्स आणि मॉल्सनाही फटका बसला. मुसळधार पावसामुळे झालेले नुकसान दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, येऊ घातलेल्या वादळामुळे दुबईमधील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पोलिसांनीही रहिवाशांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीबद्दल इशारा दिला होता. मंगळवार दुपारपासून ते बुधवारी पहाटे अस्थिर हवामानाची आणखी एक लाट पश्चिम भागातून सुरू होईल आणि देशाच्या विखुरलेल्या भागात पसरेल, असा इशारा यूएईच्या हवामान खात्याने दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा