मुंबई – पुणे मार्गिकेवर पहिल्यांदाच धावली विस्टा डोम कोच असलेली डेक्कन एक्सप्रेस

मुंबई – पुणे मार्गिकेवर पहिल्यांदाच धावली विस्टा डोम कोच असलेली डेक्कन एक्सप्रेस

शनिवार, २६ जून रोजी मुंबई – पुणे या मार्गावर धावणाऱ्या डेक्कन एक्सप्रेसचा प्रवास हा गाडीतील प्रवाशांसाठी फारच स्मरणीय ठरला. कारण पहिल्यांदाच या गाडीला विस्टा डोम कोच लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रवासात निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता आला.

मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेसला लावण्यात आलेल्या विस्टा डोम कोचला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला या डोम कोचची सभी ४४ तिकिटे नागरिकांकडून आरक्षित करण्यात आली होती. या नव्या कोचेसचे स्वागत रेल्वेतर्फे मोठ्या दिमाखात करण्यात आले. हा सोहळा साजरा करण्यासाठी रेल्वे प्रशासनकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकावर सेल्फी पॉइंटचे आयोजन केले होते. प्रवाशांनी याला चांगला प्रतिसाद दिलेला दिसला. प्रवासी सेल्फी पॉइंट वन सेल्फी घेऊन सोशल साईट्सवर अपलोड करत होते यावेळी नागरिकांकडून किती विशेष केकही कापण्यात आला.

हे ही वाचा:

मुंबईतील ताज हॉटेलवर हल्ल्याच्या धमकीचा कॉल 

इक्बाल कासकरची १५ तास कसून चौकशी

गरीब घरातील ३३ मुलींच्या धर्मांतराची तयारी केली होती!

शेती कायद्याविरोधातील आंदोलकांचा धुडगूस

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांचे या प्रवासाचा आनंद लुटणारे फोटो शेअर केले आहेत. तर त्या सोबतच आपल्या ट्विटमध्ये पियुष गोयल असं म्हणतात की मुंबई-पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस मध्ये मोठ्या खिडकीचे पारदर्शक विस्टा कोच लावण्यात आले आहेत ज्यामुळे प्रवासाचा आनंद कैक पटीने वाढला आहे

Exit mobile version