बाजीप्रभूच्या भूमिकेतील अजय पूरकरच्या घरी जायचेय का?

विशाळगडाच्या पायथ्याशी आहे घर

बाजीप्रभूच्या भूमिकेतील अजय पूरकरच्या घरी जायचेय का?

पावनखिंड या चित्रपटातून बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका निभावणारे कलाकार अजय पूरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलेल्या घराबद्दल आता आणखी एक निर्णय घेतला आहे. या घराला भेट देण्याची संधी आता सगळ्यांना मिळू शकते.

अजय पूरकर यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या या घरासंदर्भातील नव्या निर्णयाची घोषणा केली आहे. एक व्हीडिओ शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणतात की, १९ जूनला पावनखिंड रीलिज झाला. तिथे आंबा नावाचे एक गाव आहे. आंबा घाट असेही त्याला म्हणतात. तिथे मी घर बांधले आहे. ते लोकांना आवडले. आता १४ फेब्रुवारीपासून ते खुले केले आहे. आईबाबांचे घर असे त्याला नाव दिले आहे. त्यासंदर्भातील माहिती माझ्या वेबसाईटवर आहे. याठिकाणी जाऊन तुम्ही सुट्टी घालवू शकता. नवी ऊर्जा घेऊन कामाला लागू शकता. तिथे धरण आहे, बॅकवॉटर आहे, विशाळगडाचे दर्शन घेता येईल. पावनखिंड आहे. तिथे घरगुती जेवणही मिळेल.

पूरकर यांनी सर्वांना आवाहन केले आहे की, सर्व मित्रांना आईबाबांनाही सांगेन की, आईबाबांच्या या घराला भेट द्या. सीनियर सिटिझनसाठीही नवी कल्पना लढविली आहे. प्रवासाची सोयही मी देईन. माझा चालक माझी गाडी अशी व्यवस्थाही उपलब्ध करून देतो आहे. वेबसाईटवर सगळी माहिती मिळेल. गुगलमॅपही उपलब्ध आहे. आईबाबांच्या घराला भेट द्या. इन्स्टाग्रामवर ही माहिती देऊन त्याने सर्वांना ही माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

शिर्डी विमानतळावर आता नाईट लँडिंग सुविधा

शिवजयंतीला घ्या शिवसृष्टीतील सरकारवाड्याचा अनुभव

गोव्याला जाताय.. मग जेलीफिशपासून सांभाळा. इतक्या लोकांना घेतलाय चावा

महाशिवरात्रीसाठी बेस्ट तर्फे विशेष बस सेवा

अजय पूरकर यांनी आतापर्यंत विविध चित्रपटांत केलेल्या भूमिकांमुळे ते चांगलेच लक्षात राहिले आहेत. मुळशी पॅटर्नमधील बिल्डरची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेतही ते लक्षात राहिले. फत्तेशिकस्तमध्येही त्यांनी दमदार भूमिका केली. शिवाय आता त्यांचा सुभेदार हा चित्रपटही येऊ घातला आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाखालील हा चित्रपट तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित असेल.

Exit mobile version