अरेरे!! विश्वंभर चौधरींची मतदान करण्याची संधी हुकली; मविआचे एक मत गेले

मतदार यादीत नाव गायब असल्याचे आले समोर

अरेरे!! विश्वंभर चौधरींची मतदान करण्याची संधी हुकली; मविआचे एक मत गेले

निर्भय बनो चळवळीतून भाजपाविरोधी, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, महायुतीविरोधी सभा घेणारे डॉ. विश्वंभर चौधरी यांना पुण्यात मतदान करता आलेले नाही. त्यांचे नाव मतदार यादीत नसल्यामुळे त्यांची मतदान करण्याची संधी हुकली आहे.

त्यांनी सोशल मीडियावर आपल्याला मतदान करता आलेले नसल्याचे म्हटले आहे. मतदार यादीतून नाव गायब असल्यामुळे मतदानाला त्यांना मुकावे लागले आहे.

विश्वंभर चौधरी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मी मतदार सत्तांतर करणार, जीतेगा इंडिया असे म्हणत लोकांना इंडी आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले होते. शिवाय, हाताचा पंजा, मशाल व तुतारी फुंकणारा माणूस यांना मतदान करा असे आवाहन त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून केली होती. त्यामुळे त्यांनाच आता महाविकास आघाडीला मतदान करता आलेले नाही. मविआला एका मताला त्यामुळे मुकावे लागल्याचे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

अण्णा हजारे आपले शिष्य केजरीवालांवर भडकले!

जपानला मागे टाकून भारत होणार चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था

शादाब, शोएबकडून अल्पवयीन दलित मुलीचा विनयभंग!

“पाकिस्तानला बांगड्या घालायला लावतो”

विश्वंभर चौधरी हे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान निर्भय बनोच्या माध्यमातून सभा घेऊन महाविकास आघाडीला, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस यांना विजयी करण्याचे आवाहन करत आले आहेत. त्यांचे नाव काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही टाकण्यात आले होते. मात्र नंतर ते काढण्यात आले.

Exit mobile version