वर्तमानपत्रे व इतर माध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमधून नागरीक आपले मत तयार करत असतो. पण त्या बातम्यांमध्ये तथ्याचा अभाव असेल तर चुकीची मते तयार होऊ शकतात, यासाठी विविध वर्गातील लोकांशी संवाद वाढविल्यास योग्य मत तयार होऊ शकेल, या अनुषंगाने विश्व हिंदू परिषदेच्या विशेष संपर्क विभागामार्फत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
विश्व हिन्दू परिषदेच्या विशेष संपर्क विभागाची ही अखिल भारतीय बैठक शनिवार १४ आणि रविवार १५ सप्टेंबर २०२४ ह्या दोन दिवसात, भाग्यनगर येथे पार पडली. या बैठकीला सम्पूर्ण भारतातून कार्यकर्ता बंधू भगिनी उपस्थित होते. ह्या बैठकीला विहिंपचे आतंरराष्ट्रीय महामंत्री बजरंगलाल बागडा आणि संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी मार्गदर्शन केले.
समाजातील प्रबुद्ध वर्गासोबत सम्पर्क साधण्याचे काम, यावर या बैठकीमध्ये विचारविनिमय करण्यात आला. विहिंपची गेल्या ६० वर्षातील उपलब्धी, नजीकच्या काळातील आव्हाने, वर्तमान परिस्थितीतील हिन्दू समाजासमोरील आव्हाने, विशेष करून बौद्धिक आक्रमण, मतांतरण आणि हिंदू हिताचे शासन यावर विशेष लक्ष केंद्रित करून या संबंधी प्रबुद्ध समाजात संवाद साधण्याचे काम महत्वाचे असल्याने सम्पूर्ण देशभरात अशा प्रकारचे संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
मत निर्धारक, नीती निर्धारक, राजकीय क्षेत्रातील लोक प्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, प्रोफेशनल्स, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, तसेच अन्य महत्वाच्या व्यक्तींसोबत चर्चा आणि संवाद साधून, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रासमोरील आव्हाने, बौद्धिक आक्रमणे, फेक नरेटिव्हस आदी बिंदूंवर चर्चा करण्यात येईल.
हे ही वाचा:
भारताच्या हॉकी संघाने दक्षिण कोरियाला नमवत अंतिम फेरीत मारली धडक !
उद्योगपतीला वाचविण्यासाठी तीन आयपीएस अधिकारी महिलेला छळत होते!
भारताच्या पहिल्या ‘वंदे भारत मेट्रो’चे उद्घाटन, ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ नावाने ओळख !
तालिबानी सरकारला नको पोलिओ लसी; आणली स्थगिती
समाज हा विविध समाज माध्यमं, डिजिटल आणि प्रिंट मीडिया मधून येणाऱ्या बातम्यांवर आपले मत बनवत असतो आणि अनेकदा ह्या अशा बातम्या ह्या तथ्यापासून विसंगत असतात. योग्य आणि तथ्याधारित माहिती समाजासमोर यावी आणि समाजाने त्यावर आधारित मत निर्धारण करावे, तसेच नीती निर्धारण पण त्यानुसार व्हावे. ह्यासाठी विहिंप मत निर्धारक, नीती निर्धारक, सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि प्रबुद्ध नागरिकांसोबत विशेष संपर्काद्वारे व्यापक प्रमाणात संपर्क आणि संवाद साधेल, अशी माहिती विहिंपचे क्षेत्र संपर्क प्रमुख संजय ढवळीकर यांनी दिली.