‘विशाळ गड’ घेणार मुक्त श्वास, कारवाईला उद्यापासून सुरुवात !

राज्य सरकार आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा निर्णय

‘विशाळ गड’ घेणार मुक्त श्वास, कारवाईला उद्यापासून सुरुवात !

महाराष्ट्रातील हजारो शिवभक्तांनी आणि राज्यातील विविध हिंदू संघटनाही गेल्या अनेक महिन्यांपासून चालू केलेल्या ‘विशाळ गड अतिक्रमण मुक्ती संग्राम मोहिमे’ला आता यश मिळणार आहे. विशाळ गडावरील अतिक्रमण काढण्यास उद्यापासून होणार सुरुवात होणार आहे. राज्य सरकार आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

विशाळ गडावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीकरिता छत्रपती संभाजी राजे आणि हजारो शिवभक्त आज विशाळ गडावर दाखल झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हजारो शिवभक्तांसह संभाजी राजे गडावर जाणार होते. तत्पूर्वी छत्रपती संभाजी राजेंची कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा झाली. चर्चेनंतर संभाजी राजे गडाच्या पायथ्याशी थांबले गडावर गेले नाहीत. अतिक्रमणा विरोधात संभाजी राजेंनी गडावर जाण्याचा निर्धार केला होता. मात्र, प्रशासनाने संभाजी राजेंना आश्वस्त केलं आहे. गडावरील अतिक्रमणावर उद्यापासून कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने संभाजी राजेंना आश्वासन दिले आहे.

हे ही वाचा:

मणिपूरच्या जिरीबाममध्ये दहशतवादी हल्ला, एक जवान हुतात्मा !

काँग्रेस नेत्याने पसरवली खोटी बातमी

कॅन्सरग्रस्त अंशुमान गायकवाड यांना बीसीसीआयकडून १ कोटी !

आजारी म्हणून जामीन मिळवलेले लालूप्रसाद यादव अंबानींच्या लग्नसमारंभात ठणठणीत

दरम्यान, राज्यातील सर्व गडकिल्ले अतिक्रमण मुक्त होऊन त्यांचा ऐतिहासिकपणा आणि पावित्र्य जपण्याचा शासनाचा देखील तसाच प्रयत्न असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तसेच विशाळ गडावर झालेल्या दगडफेकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून छत्रपती संभाजी राजे यांच्याशीही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version