विशाल अग्रवालसह तिघांना तीन दिवसीय पोलीस कोठडी!

पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय

विशाल अग्रवालसह तिघांना तीन दिवसीय पोलीस कोठडी!

पुणे कार अपघात प्रकरणी आरोपी विशाल अग्रवालसह तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पुणे सत्र न्यायालयाने हा महत्वपूर्व निकाल दिला आहे.पोलिसांनी सात दिवसांची न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती.मात्र, न्यायालयाने आरोपी विशाल अग्रवालसह तिघांना २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुणे हिट अँड रन केसमधील आरोपी वेदांत अग्रवाल याचे वडील आरोपी विशाल अग्रवालसह तिघांना आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.पुणे पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती.मात्र, कोर्टाने ती नामंजूर करत तीन दिवसांची पोलीस कोठडी तिन्ही आरोपीना सुनावली, अर्थात २४ तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे.यामध्ये आरोपी विशाल अग्रवाल याच्यासह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांचा समावेश आहे.या तिघांनाही आता तीन दिवसीय पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा:

उपराष्ट्रपती धनखड इराणला रवाना, काय कारण?

अपघातानंतर पुणे महानगरपालिकेला आली जाग; अनधिकृत पबवर हातोडा!

न्यायालय परिसरात विशाल अग्रवालच्या अंगावर शाईफेकीचा प्रयत्न

आगरतळा रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी नागरिकांना अटक!

अटक करण्यात आलेले आरोपी तपासाला सहकार्य करत नसल्याने आणि जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची तपासणी सुद्धा करायची आहे, असा मुद्दा सरकारी वकिलांकडून न्यायालयात मांडण्यात आला.त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी जेणेकरून संपूर्ण घटनेचा तपास करता येईल यासाठी पुणे पोलिसांनी न्यायालयात सात दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती.मात्र, न्यायालयाने तीन दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या तीन दिवसीय पोलीस कोठडी मधून नेमकी काय माहिती समोर येते हे बघणे महत्वाचे असणार आहे.

Exit mobile version