‘विरूष्का’कडून कोरोनाबाधितांना दोन कोटींची मदत

‘विरूष्का’कडून कोरोनाबाधितांना दोन कोटींची मदत

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गंभीर रूप धारण केलं असून रोजच्या रुग्णवाढीच्या संख्येने आता चार लाखांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांना मदत करण्यासाठी आता अनेक लोकं पुढे येत असून त्या यादीत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचेही नाव सामिल झाले आहे. या जोडप्याने कोरोनाबाधितांना मदत म्हणून दोन कोटी रुपये दिले आहेत.

या दोघांनी कोरोनाबाधितांना मदत म्हणून एक फंड उभारायला सुरुवात केली असून केटो या नावाच्या प्लॅटफॉर्मवर #InThisTogether या नावाने एक फंड उभारायला सुरु केलं आहे. या फंडच्या माध्यमातून विराट कोहली आणि अनुष्का शर्माने सात कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष ठेवलं आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने यावर एक निवेदन जारी केलं असून त्यामध्ये सांगितलं आहे की, #InThisTogether या नावाने हे अभियान सात दिवस चालेल. या अभियानाच्या माध्यमातून जे काही पैसे जमा होतील ते एसीटी ग्रांट्स नावाच्या एका संस्थेला देण्यात येतील. या फंडच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा तसेच इतर अनेक प्रकारच्या साहित्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत घुसमट होते- संजय काकडे

ठाकरे सरकारच्या घपल्याचा ‘मनोरा’ ३०० कोटींचा

मोदींनी पुन्हा घेतली कोरोनाची आढावा बैठक

तामिळनाडूत स्टालिन राज सुरु

आपला देश आता एका मोठ्या संकटातून वाटचाल करत असून या वेळी आपण एकत्र आलं पाहिजे आणि लोकांचे जीव वाचवले पाहिजेत. त्यामुळे या अभियानात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असं आवाहन विराट कोहलीने केलं आहे. तर या फंडच्या माध्यमातून कोरोनाबाधितांना लढण्यास मदत मिळेल अशी आशा अनुष्का शर्माने केली आहे.

Exit mobile version