सेहवाग देतोय कोविड रुग्णांना मोफत जेवण

सेहवाग देतोय कोविड रुग्णांना मोफत जेवण

आपल्या आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध असणारा भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा आता कोविड रुग्णांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. वीरेंद्र सेहवागच्या ‘सेहवाग फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेतर्फे कोविड रुग्णांना आणि इतर गरजूंना मोफत आहार दिला जाणार आहे. समाजमाध्यमांवरून सेहवागने या संबंधीची घोषणा केली आहे.

देशात सध्या कोरोनाचा प्रलय सुरु असून दररोज लाखो रुग्ण या महामारीच्या कचाट्यात अडकत आहेत. अशातच देशातील आरोग्य व्यवस्थांवर ताण पडत असून अनेक ठिकाणी रुग्णांना आवश्यक त्या गोष्टी मिळताना अडचण येत आहे. पण अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांसाठी समाजातून अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. यात अनेक क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, ब्रेट ली यांनी निधी दिला आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने प्लाझ्मासाठी पुढाकार घेतला आहे. त्यातच आता धडाकेबाज वीरेंद्र सेहवागची भर पडली आहे.

हे ही वाचा:

ब्रेट लीकडून भारताला ४० लाखांची मदत

फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे काय दिला इशारा?

१० राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांची वॉर्ड ऑफिसरला मारहाण

‘सेहवाग फाउंडेशन’ या आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिल्लीमधील कोविड रुग्नांना आणि इतर गरजुंना घरगुती, पौष्टीक आणि सकस आहार उपलब्ध करून देण्याचे सेहवागने ठरवले आहे. तसेच गरजूंसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स विकत घेण्याची प्रक्रियाही इहवाग फाउंडेशनतर्फे सुरु असून जर यासाठी दान देण्याची कोणाची इच्छा असल्यास द्यावे असे आवाहनही सेहवाग आणि सेहवाग फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version