टीम इंडियाच्या ‘ग्रेटेस्ट ऑफ द ऑल टाइम’ विराटबद्दल नेटिझन्सकडून कृतज्ञता

निवृत्तीनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

टीम इंडियाच्या ‘ग्रेटेस्ट ऑफ द ऑल टाइम’ विराटबद्दल नेटिझन्सकडून कृतज्ञता

भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीने भारताला दुसऱ्या टी २० विश्वचषकात विजय मिळवून दिल्यानंतर ट४ २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताच, चाहत्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. इंटरनेटवर कोहलीचे कौतुक करणाऱ्या पोस्टचा अक्षरशः पूर आला होता.

‘धन्यवाद, विराट कोहली’ या शब्दांत क्रिकेटचाहते त्याचे कौतुक करत होते. ‘हा माझा शेवटचा टी २० विश्वचषक होता. आम्हाला नेमके हेच साध्य करायचे होते,’ अशी प्रतिक्रिया कोहलीने बार्बाडोसमध्ये दिली. भारताला तब्बल ११ वर्षांनंतर जागतिक स्पर्धेत विजय मिळाला.

हे ही वाचा:

मुसळधार पावसामुळे दिल्ली जलमय; दिल्लीत चार मुलांसह सहा जण बुडाले

इटलीत तीन जणांनी इंडियन एक्स्प्रेसच्या कार्यकारी संचालकाची बॅग लांबवली

‘सूर्या’ने झेल पकडला; भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकला!

विराट कोहलीच्या पाठोपाठ रोहित शर्माचीही टी २०मधून निवृत्ती

‘एखाद्या दिवशी तुम्हाला असे वाटते की तुम्ही धाव घेऊ शकत नाही आणि असे काही अविश्वसनीय घडते. देव महान आहे. आता किंवा कधीच नाही, अशी ही परिस्थिती असते. त्यामुळे भारताकडून खेळलेला हा माझा शेवटचा टी-२० सामना होता. आम्हाला तो कप उंचवायचा होता,’ अशी प्रतिक्रिया कोहलीने दिली. विराट कोहलीने जाहीरपणे ‘लाइव्ह’ निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याचे कौतुक करणाऱ्या पोस्ट लिहिल्या. ‘महान व्यक्ती, मिथक, सार्वकालिक महान व्यक्ती’ अशी प्रतिक्रिया नेटफ्लिक्स इंडियाने दिली. चाहत्यांनीही सोशलम मीडियावर कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला.

‘सार्वकालिक महान व्यक्ती, गेमचेंजर, प्रेम, मैत्री आणि कुटुंबासाठी आदर्श ठरणाऱ्या माणसाप्रति आनंद व्यक्त करण्याकरिता विराट कोहलीच्या चाहत्यासाठी आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे,’ अशी प्रतिक्रिया शुभने दिली आहे. ‘विराट कोहली, खूप खूप आभार. तू सार्वकालिक महान आहेत. द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ , अशी प्रतिक्रिया हिमांशू तिवारीने दिली. इंटरनेटवर गोट (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) आणि विराट कोहली हे टॉप ट्रेन्डिंगमध्ये होते.

Exit mobile version