भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवार, ३ डिसेंबर पासून सुरु होत आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा निर्णायक सामना ठरणार आहे. या सामन्याच्या निउकळावर मालिकेचा निकाल अवलंबून आहे त्यामुळे या सामन्याचे महत्व अधिक आहे. अशातच या सामन्यात भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि कर्णधार विराट कोहली परत आला आहे. इतकच नाही तर विराट कोहली याने आज अखेर नाणेफेक देखील जिंकली आहे. त्यामुळे या सामन्याची सुरुवात सकारात्मक झाल्याचे म्हटले जात आहे.
या सामन्यावर पावसाचे सावट आहे. १ आणि २ डिसेंबर रोजी मुंबई सह महाराष्ट्राच्या अनेक भागांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे वानखेडे मैदानावरही थोडा परिणाम झालेला दिसला. या पार्शवभूमीवर सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळातही काही बदल झाले आहेत. नाणेफेकीची वेळ पुढे ढकलण्यात आली असून ११.३० वाजता नाणेफेक झाली. विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
ओमिक्रोन झालेल्या रुग्णांच्या संपर्कातले आणखी पाच जण पॉझिटीव्ह
वानखेडेवर पडणार धावांचा पाऊस की वारुणराज फिरवणार सामन्यावर पाणी ?
शेवडे यांनी मांडलेली विषवल्ली शहरात आहे, त्याचा मुकाबला करावा लागेल
महाराष्ट्र अलर्टवर! ओमिक्रोन मुंबईच्या उंबरठ्यावर?
या सामन्यात तीन ऐवजी दोनच सत्र खेळवली जाणार आहेत. १२ वाजता पहिले सत्र खेळायला सुरुवात झाली आहे. तर दुपारी २.४० ते ३ वाजेपर्यंत चहापानासाठी विश्रांती असणार आहे. तर त्यानंतर पहिल्या दिवसाचे अंतिम सत्र खेळले जाणार आहे. सामन्याच्या पाहिल्या दिवशी एकूण ७८ षटकांचा खेळ होणार आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. अजिंक्य राहणे, इशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी कर्णधार विराट कोहली हा परत आला असून सोबतच मोहम्मद सिराज आणि जयंत यादव यांना संधी देण्यात आली आहे.