रोहित शर्मा कसोटी खेळणार नाही असा निर्णय त्याने घेतला नंतर आता विराटने वनडे न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन खेळाडूंमध्ये विस्तव जात नाही, याची चर्चा सुरू झाली आहे. संघप्रशिक्षक म्हणूनही रवी शास्त्री आता संघासोबत नसल्यामुळे विराटला पाठिंबा नाही. नवे प्रशिक्षक राहुल द्रविड आले आहेत. त्यांना रोहित कर्णधार हवा आहे किंवा रोहितला कर्णधार करण्यासाठी द्रविड यांना प्रशिक्षकपदी आणले आहे असे दावे केले जात आहेत.
भारतीय संघ या आठवड्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जाणार असून कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा दुखापतीमुळे कसोटीतून बाहेर झाला असून रोहित वनडे खेळणार का याबाबत कोणतीही अधिकृत माहिती बीसीसीआयकडून देण्यात आलेली नाही. मात्र, ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहली याने वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्याची मागणी केली आहे.
विराट कोहली याने केलेल्या या विश्रांतीच्या मागणीमुळे विराट कोहलीकडून वनडे संघाचे कर्णधार पद काढून घेतल्यामुळे तो खेळत नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने भारताच्या टी- २० आणि वनडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवल्याचे जाहीर केले होते. विराट याने टी- २० संघाचे कर्णधार पद सोडल्यावर त्याने वनडे संघाचे कर्णधार पद सोडावे असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले होते, मात्र दिलेल्या वेळात विराट कोहलीने निर्णय न घेतल्याने थेट बीसीआयआयने रोहित शर्माच्या नावाची घोषणा केली. मात्र, त्याआधी विराटने टी- २० संघाचे कर्णधार पद सोडू नये यासाठी त्याला विनंती करण्यात आली होती. मात्र, विराटने ठाम राहत कर्णधारपद सोडले त्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी एकच कर्णधार असावा असा निर्णय घेतला.
हे ही वाचा:
समीर वानखेडे यांची माफी मागा अन्यथा… नवाब मलिक यांना धमकीचे पत्र
श्रीलंकेत संसद बरखास्त, संसदीय लोकशाही धोक्यात?
‘हा विजय म्हणजे महाविकास आघाडीला चपराक’
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या संबंधांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून रोहित आणि विराट यांच्यातील वाद आता पुन्हा समोर आले आहेत. बीसीसीआयच्या निर्णयावर विराट कोहली नाराज असल्याच्या चर्चा आहेत. विराट बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांचे फोन उचलत नसल्याचे वृत्त आहे. विराट हा आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच्या सराव सत्रातही सहभाग घेतला नसून थेट विलगीकरणात दाखल झाला. मात्र, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे विराटला कुटुंबासोबत वेळ घालवायचा असल्याने त्याने विश्रांती मागितली असल्याचे सांगितले आहे.