आयपीएलच्या गेल्या मोसमापासून डावाच्या मध्यभागी बदली खेळाडूंचा इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू झाला. ज्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्मासह अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे, आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत आठ वेळा २५० हून अधिक धावा फलंदाजांनी झोडपून काढल्या आहेत. या नियमामुळे गोलंदाजांचा सुपडा साफ होताना दिसत आहे. रोहितनंतर आता भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेही याविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे. विराटने रोहित शर्माने केलेल्या नाराजीचे समर्थन करून या नियमावर टीका केली आहे. या नियमामुळे खेळाचा समतोल बिघडत असल्याचे म्हटले आहे.
विराटने म्हणाला की, ‘मी रोहितला सपोर्ट करतो. मनोरंजन हा खेळाचा एक भाग आहे. पण त्यात समतोल असायला हवा. या नियमामुळे खेळाचा समतोल बिघडला आहे आणि अनेकांना असेच वाटत आहे, फक्त मलाच नाही.’ एका सामन्यात दोन भारतीय खेळाडूंना संधी मिळावी म्हणून हा नियम लागू केल्याचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितले होते. त्यावर विराट कोहली म्हणाला की, मला खात्री आहे की जयभाई या नियमाचा नक्कीच विचार करतील आणि ठोस पावले उचलून निकषापर्यंत पोहोचतील.
रोहितने या आधीच आपली नाराजी व्यक्त केली होती. त्याने असे म्हटले होते की, मी या नियमाचा चाहता नाही. याचा अष्टपैलू खेळाडूंवर विपरीत परिणाम होईल. क्रिकेट हा १२ नव्हे तर ११ खेळाडूंचा खेळ आहे. काय करावे, असा प्रश्न गोलंदाजांना पडला आहे. गोलंदाज प्रत्येक चेंडूवर चार-सहा धावा देतील, अशी परिस्थिती मी कधी पाहिली नाही. प्रत्येक संघात बुमराह किंवा राशिद खान नसतो, असेही रोहीत म्हणाला होता.
हेही वाचा :
काँग्रेसचा बचाव करण्यासाठी सरसावले राजदीप; अल्पसंख्य नव्हे गरिबांसाठी होत्या योजना
काँग्रेसचा बचाव करण्यासाठी सरसावले राजदीप; अल्पसंख्य नव्हे गरिबांसाठी होत्या योजना
काँग्रेसच्या भूलथापांना मतदार फसणार नाहीत
पुढील हंगामात हार्दिकचे ‘एका सामन्याच्या बंदी’ने स्वागत!
अतिरिक्त फलंदाजामुळे, पॉवरप्लेमध्ये २०० प्लसच्या स्ट्राइक रेटने धावा बनत आहेत. फलंदांना जाणीव आहे की, आठव्या क्रमांकावरही एक फलंदाज आहे. क्रिकेटमध्ये असे वर्चस्व नसावे, असे माझे मत आहे, असेही रोहीत म्हणाला होता.