संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषकानंतर विराट कोहलीने भारतीय टी २० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. विराटने आपल्या ट्विटरवरुन याबाबतचं एक निवेदन जारी केलं आहे. ‘ऑक्टोबरमध्ये दुबईत होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर मी टी-२० कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे’, असं त्याने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. या निर्णयानंतर टी-२० फॉरमॅटमध्ये रोहित शर्माकडे टीम इंडियाचे कर्णधारपद जाण्यााचा मार्ग खुला झाला आहे. एकदिवसीय आणि टी ट्वेन्टी संघाचा कर्णधार म्हणून कोहलीच्या कारकीर्दीविषयी बऱ्याच काळापासून अटकळ बांधली जात होती की त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं जाऊ शकतं, विशेषत: आयपीएलमध्ये रोहित शर्माचा उत्कृष्ट रेकॉर्ड, ज्यामध्ये त्याने मुंबई इंडियन्सला पाच वेळा जेतेपद मिळवून दिलंय.
३४ वर्षीय रोहित वनडे आणि टी -२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. तो टी-२० कर्णधाराची भूमिका बजावण्याची आता शक्यता आहे. या वर्षाच्या अखेरीस न्यूझीलंडविरुद्धच्या होणाऱ्या मालिकेत तो भारताचा कर्णधार म्हणून नव्या कारकीर्दीला सुरुवात करु शकतो. पण भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक वेगळीच बातमी समोर येत आहे. विराट कोहलीला रोहित शर्माला उपकर्णधारपदावरून हटवायचे होते, अशी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
हे ही वाचा:
धक्कादायक: दहा डीसीपींकडून गोळा केले ४० कोटी रुपये
तिरुपती देवस्थान समितीवर मिलिंद नार्वेकर कसे चालतात?
काळजी घेणाऱ्या इसमामुळेच ते कुटुंबीय पडले काळजीत; काय घडले?
पीटीआय या वृत्तसंस्थेने हा रिपोर्ट दिला आहे. रिपोर्टनुसार, असं म्हटलं जातंय की रोहितला वनडे-टी-२० च्या उपकर्णधारपदावरून हटवण्याचा प्रस्ताव घेऊन कोहली निवड समितीकडे गेला होता. रोहित ३४ वर्षांचा झाला आहे. अशा परिस्थितीत केएल राहुलला वनडेमध्ये उपकर्णधार आणि टी-२० मध्ये रिषभ पंतला कर्णधार केले पाहिजे, असं विराटचं म्हणणं होतं. तसं मत त्याने बीसीसीआयसमोर ठेवलं होतं. पण बीसीसीआयने रोहितची कॅप्टन्सी बघितली होती, त्याच्यातले नेतृत्वगुण हेरले होते. त्याचमुळे विराटची डाळ शिजली नाही, आणि विराटचा प्लॅन विराटवरच उलटलेला दिसून आला.