वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा टी-२० कर्णधार

वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा टी-२० कर्णधार

टी ट्वेण्टी वर्ल्ड कप तोंडावर असताना टीम इंडियात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. कारण कर्णधार विराट कोहली टी ट्वेण्टीच्या कर्णधारपदावरुन पायउतार होणार आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून याबाबतची घोषणा केली. विराट कोहली केवळ टी ट्वेण्टीची कॅप्टन्सी सोडणार आहे. तो वन डे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी कायम असेल. दोनच दिवसापूर्वी विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत.

विराट कोहलीने भारताकडून ६५ कसोटी, ९५ वन डे आणि ४५ टी २० सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. यापैकी ३८ कसोटींमध्ये विजय मिळवला, ६५ वन डे जिंकले, तर २९ टी २० सामने आपल्या नावे केले.

टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर अशी रोहित शर्माची ओळख आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये जबरदस्त कॅप्टन्सी करुन, मुंबई इंडियन्सला सर्वाधिक ५ विजेतेपदं मिळवून दिली आहेत.

हे ही वाचा:

२१ दिवस क्वारंटाईन करूनही चीनमध्ये कोरोना कसा?

५ जी स्पेक्ट्रममध्ये मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय

फ्रान्सने आयएसआयएस प्रमुखाला संपवले

अभिनेत्याच्या जाचाला कंटाळून शरीरसौष्ठवपटू मनोज पाटीलची आत्महत्या

रोहित शर्मा भारताकडून ४३ कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये एका द्विशतकासह ८ शतकं आणि १४ अर्धशतकं त्याने ठोकली आहेत. तर रोहित शर्माने २२७ वन डे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २९ शतकं आणि ४३ अर्धशतकं झळकावली आहेत. ३ द्विशतकं ठोकणारा रोहित हा एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-२० विश्वचषक १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत.

Exit mobile version