बेन स्टोक्सवर कोहली, स्मिथची स्तुतीसुमने

शतकी खेळी गेली व्यर्थ, पण झाले कौतुक

बेन स्टोक्सवर कोहली, स्मिथची स्तुतीसुमने

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी स्पर्धेत इंग्लंडच्या बेन स्टोक्सने १५५ धावांची तडाखेबंद खेळी केली. मात्र, त्याची खेळी व्यर्थच ठरली. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ४३ धावांनी मात केली आणि ऍशेस मालिकेत २-० ने आघाडी घेतली. या तडाखेबंद खेळीमुळे स्टोक्सवर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने स्तुतीसुमने उधळली आहेत.

२१४ चेंडूमध्ये १५५ धावा करणाऱ्या स्टोक्सचे विराटने ट्विटरच्या माध्यमातून कौतुक केले. ‘स्टोक्सला मी तोडीस तोड स्पर्धक खेळाडू म्हणतो, ते उगीच नाही. त्याने उत्तम खेळ करून दाखवला. मात्र, एकूणच ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी चांगली झाली,’ असे कौतुक विराटने केले आहे.

ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेन स्टोक्सने लॉर्ड्सवर १५५ धावांची तडाखेबंद खेळी केली. स्टोक्सने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची पिसे काढली. त्याने एका षटकात तीन चौकार ठोकले आणि कॅमरून ग्रीनच्या गोलदांजीवर सहा षटकार खेचले. दुसऱ्या बाजूने ब्रॉड साथ देत असताना स्टोक्सने १३वे कसोटी शतक ठोकले. ७३व्या षटकात जोश हॅझलवूडच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर फटका लगावताना यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरी याने त्याला झेलबाद केले. तेव्हा इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या लक्ष्यापासून केवळ ७१ धावांनी दूर होता.

या सामन्यानंतर स्टीव्ह स्मिथनेही स्टोक्सचे कौतुक केले. “स्टोक्स हा एक अविश्वसनीय खेळाडू आहे. ज्या प्रकारे तो सामन्यात करामत दाखवतो, हे खरोखरच अद्भुत आहे. आम्ही त्याला अनेकदा धावा जोडताना पाहिले आहे. ही एक अविश्वसनीय खेळी होती. मी जेव्हा त्याचा झेल सोडला, तेव्हा मी हे काय करून बसलो, हे जाणून मी थोडावेळ स्तब्ध झालो. सुदैवाने नंतर तो बाद झाला,’ असे स्टिव्ह स्मिथने म्हटले.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीच सरकारमध्ये सामील झाल्याने ‘मविआ’ नामशेष!

‘ते’ ९ आमदार वगळता बाकीच्यांना पक्षाची दारे खुली

शपथविधीला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे सर्व नेते बडतर्फ

अजित पवारांच्या येण्यामुळे महायुतीला अधिक ताकद मिळेल!

पाच कसोटी सामन्यांच्या ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-०ने आघाडी घेतली असून पुढील सामना ६ जुलै रोजी हेडिंग्ले येथे रंगणार आहे.

Exit mobile version