टीम इंडिया नवीन वर्षाची सुरुवात आपल्या तीन दिग्गज खेळाडूंविना करणार आहे. मंगळवारपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका टीम इंडिया खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघ विराट कोहली, रोहीत शर्मा आणि के. एल. राहुल यांच्याविना मैदानात उतरणार आहे. कर्णधार हार्दिक पांड्या या संघाचे नेतृत्व करेल.
या वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतातच खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर आशिया चषकही यंदा खेळवला जाणार आहे. यंदा टीम इंडियाला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या ही आघाडीचे सहा प्रमुख फलंदाज ठरलेले आहेत. ते सातत्याने अपयशी ठरताहेत. याचा फटका टी-२० विश्वचषकात पाहायला मिळाला. त्यांच्याकडून साजेशी कामगिरी झालेली नाही. सांघिक कामगिरीबद्दल सांगायचे तर, गेल्या आठवड्यात कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतने न्यूझीलंडमध्ये ईशान किशनसह डावाची सुरुवात केली. पंतची श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड झालेली नाही. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋतुराज गायकवाड हा ईशान किशनसोबत डावाची सुरुवात करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ईशान आणि ऋतुराजला संधी
ईशान आणि ऋतुराज गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करताहेत. त्यांनी संघातील स्थानाची चिंता न करता, त्यांचे कौशल्य दाखवण्याची ही खरी संधी आहे. १८ महिन्यांनंतर खेळल्या जाणार्या पुढील टी-२० विश्वचषकात दोघांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी १५ पेक्षा कमी टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील. कारण यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक हे याचे मुख्य कारण आहे. याच कारणामुळे संघ व्यवस्थापन वनडेला अधिक प्राधान्य देणार आहे.
हेही वाचा :
वीर सावरकर बॉक्सिंग क्लबचे जबरदस्त यश
नोटाबंदीला सदोष ठरवणाऱ्या ३ डझनपेक्षा जास्त याचिका फेटाळल्या
सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले
हार्दिककडे शुभमन गिल सलामीवीराच्या रूपाने दुसरा पर्याय आहे. गिलने आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. दुसऱ्या क्रमांकावर ३६० स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादववर विश्वास ठेवू शकतो. हार्दिकने जर सहा गोलंदाज प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले तर अशा स्थितीत दीपक हुडाला पहिल्या सामन्यात संधी मिळू शकते.
सॅमसनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
मधल्या फळीतील संजू सॅमसन आणि अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला राहुल त्रिपाठी यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. त्रिपाठी काही काळापासून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नाही आणि त्याला श्रीलंकेविरुद्धही बाहेर राहावे लागेल. कारण सॅमसनला त्याच्या अनुभवाच्या जोरावर प्राधान्य मिळू शकते.
शिवम मावी आणि मुकेश कुमार यांचा संघात समावेश केला आहे. मात्र वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, हर्षल पटेल आणि उमरान मलिक यांचीच निवड होण्याची शक्यता आहे. भारताकडे वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांच्या रूपाने अष्टपैलू खेळाडू आहेत. अनुभवी फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलला मालिकेतील पहिल्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.
श्रीलंका संघ कडवी टक्कर देईल
सध्याचा आशिया चषक चॅम्पियन श्रीलंका संघ आपल्याच भूमीवर भारताला कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. श्रीलंकेने लंका प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अविष्का फर्नांडो, चमिका करुणारत्ने आणि सदीरा समरविक्रमाला टीममध्ये श्रीलंकेने कायम ठेवले आहे.