कोहली ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू!

Virat Kohli receives the Player of the month Award by ICC!

कोहली ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू!

भारताचा सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ‘प्लेअर ऑफ थे मंथ’ या पुरस्स्काराने सन्मानित केले आहे. विराट कोहलीचा हा पहिलाच असा पुरस्कार आहे. पाकिस्तानची अनुभवी अष्टपैलू निदा दार हिने त्यांच्या आशिया चषक मोहिमेतील अप्रतिम कामगिरीमुळे महिला गटात हा सन्मान जिंकला. दारने जेमिमाह रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा या भारतीय जोडीला मागे टाकून हा मान प्राप्त केला.

हे ही वाचा:

‘मराठी मुस्लिम संकल्पनेचा प्रचार करणारे तोतया’

एका लग्नाची पुढची गोष्टचा १२,५०० वा प्रयोग, राज-फडणवीस उपस्थित राहणार

दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांना राष्ट्रवादीकडून ती मदत अद्याप नाही, पत्नीने केली विनंती

उत्तराखंड भूकंपाने हादरले

कोहलीने ऑक्टोबर महिन्यात २०५ धावा करत आपल्या सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले. आयसीसीने त्याच्या या कामगिरीची दखल घेत त्याची या पुरस्कारासाठी निवड केली. ऑस्ट्रेलियात सध्या भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एका टप्प्यावर ४ बाद ३१ धावा केलेल्या असताना विराट कोहलीने सामन्याची सूत्रे हाती घेतली. कोहलीच्या संस्मरणीय खेळीमुळे भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकला.या सामन्यात विराटच्या ५३ चेंडूतील नाबाद ८२ धावांमुळे भारताने १६० धावसंख्येपर्यंत मजल मारली. या खेळीसह विराटने मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर चाहत्यांची मने जिंकली होती.
यासंदर्भात विराट म्हणाला की, ऑक्टोबर महिन्यासाठी आयसीसीचा सर्वोत्तम पुरूष खेळाडू म्हणून मला निवडले गेले हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. जगभरातील चाहत्यांनी तसेच पॅनेलने माझी उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केल्यामुळे ही प्रशंसा माझ्यासाठी आणखीनच खास झाली आहे,”. कोहली पुढे म्हणाला, ” ज्यांनी या महिन्याभरात चमकदार कामगिरी केली अशा सगळ्याच खेळाडूंबद्दल मला आदर आहे. मला साथ देणाऱ्या माझ्या संघसहकाऱ्यांचाही मी आभारी आहे”. भारताला टी २० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत धडक मारण्यात विराटच्या या कामगिरीचे महत्त्वाचे योगदान आहे. १० नोव्हेंबरला भारत दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडशी दोन हात करणार आहे. त्यावेळी पुन्हा एकदा विराटची अशीच कामगिरी होणार का, याची आता प्रतीक्षा आहे.

Exit mobile version