विराटचे ऑस्ट्रेलियातील सातवे शतक

भारत विजयाच्या दिशेने, कांगारु दुसऱ्या डावात ३ बाद १२

विराटचे ऑस्ट्रेलियातील सातवे शतक

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पहिल्या डावात अवघ्या १५० धावांत गारद झालेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला १०४ धावांत गुंडाळले आणि दुसऱ्या डावात ६ बाद ४८७ धावांची खेळी करून दुसऱ्या डावात यजमान ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज १२ धावांत तंबूत पाठवले. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी ५२२ धावांची आवश्यकता आहे.

जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचे ५ बळी घेत तडाखा दिला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ १०४ धावांवरच कोलमडला होता. त्याला उत्तर देताना भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले. यशस्वी जयस्वालने सलामीवीर म्हणून १६१ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने आपल्या ३० व्या कसोटी शतकाची नोंद केली.

पर्थवरील या सामन्यात भारतीयांचे पारडे तिसऱ्या दिवसानंतर जड आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा हा सामना तिसऱ्या दिवशीच संपुष्टात येणार की काय अशी शक्यता होती. पण भारताने दमदार खेळाचे प्रदर्शन करत कांगारुंपुढे ५३४ धावांचे लक्ष्य ठेवले. हे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्न ऑस्ट्रेलियाचे तीन प्रमुख फलंदाज माघारी परतले. त्यात जसप्रीत बुमराहने दोन बळी घेतले. या सामन्यात त्याच्या बळींची संख्या ७ झाली आहे.

हे ही वाचा:

आता नवी आवई म्हणे अनुसूचित जमाती हिंदू नाहीत ? !

राऊतांनी ठाकरेंच्या नेत्यांकडे अक्कल पाजळावी अन पवारांच्या दारासमोर पाहणी करणाऱ्याच्या भूमिकेत राहावे!

विकास, उत्तम प्रशासनाचा आणि परिवारवादाला मूठमाती देणारा हा विजय

मालेगाव वोट जिहाद घोटाळा आता १००० रुपये कोटींचा झाला!

विराट कोहलीने शतकी खेळीचे प्रदर्शन केले. हे त्याचे ३० वे शतक असले तरी त्याने आपला आदर्श खेळाडू सचिन तेंडुलकरची कामगिरी मागे टाकली. सचिनने ऑस्ट्रेलियात सहा शतके ठोकली आहेत. विराटने सातवे शतक ठोकले. त्याने अचूक १०० धावा केल्या. यशस्वी जयस्वालने १६१ धावांची खेळी करत चांगली सुरुवात करून दिली. के.एल. राहुलने ७७ धावा जोडल्या.

स्कोअरबोर्ड
भारत पहिला डाव १५० आणि दुसरा डाव ६ बाद ४८७ डाव घोषित विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला डाव १०४ आणि दुसरा डाव ३ बाद १२

Exit mobile version