मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वनडेतील ४९ शतकांशी भारताचा बहारदार खेळाडू विराट कोहलीने बरोबरी केली आहे. कोलकात्याच्या इडन गार्डनवर झालेल्या वनडे वर्ल्डकप क्रिकेट सामन्यात विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे विक्रमी शतक झळकाविले. विशेष म्हणजे आपल्या ३५व्यावाढदिवशी विराटने ही कामगिरी करून दाखविली. त्यामुळे त्याच्या या शतकाला विशेष महत्त्व आहे.
विराटने १२१ चेंडूंमध्ये १०१ धावांची ही खेळी केली. त्यात १० चौकार त्याने लगावले. एकही षटकार या खेळीत नाही. महत्त्वाचे म्हणजे विराटने याआधी याच स्टेडियमवर १४ वर्षांपूर्वी आपले पहिले वनडे शतक ठोकले होते. त्याच स्टेडियमवर त्याने विक्रमी ४९वे वनडे शतक झळकाविले आहे. या स्टेडियमवर २००९मध्ये विराटने श्रीलंकेविरुद्ध आपले पहिले वनडे शतक झळकावले होते. त्यावेळी सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर विराट मैदानात उतरला होता आणि त्याने ही शतकी खेळी केली होती. यावेळी सचिनचा शतकाही संबंध आहेच. सचिनच्या ४९ वनडे शतकांची विराटने बरोबरी केली आहे. विराटच्या खात्यात आता २९ कसोटी शतके आहेत. तेव्हा सचिनच्या १०० शतकांशी बरोबरी करण्यासाठी त्याला आणखी कणखर वाटचाल करावी लागेल.
मास्टर ब्लास्टर सचिननेही विराटचे अभिनंदन करणारा संदेश एक्सवर टाकला आहे. सचिनने लिहिले आहे की, ‘मला ४९ ते ५० होण्यासाठी गेल्या वर्षी ३६५ दिवस लागले पण तू काही दिवसांत ४९ ते ५० हा प्रवास करशील.’
सचिनने नुकताच त्याचा ५०वा वाढदिवस साजरा केला. त्याला धरूनच त्याने हे ट्विट केले.
Well played Virat.
It took me 365 days to go from 49 to 50 earlier this year. I hope you go from 49 to 50 and break my record in the next few days.
Congratulations!!#INDvSA pic.twitter.com/PVe4iXfGFk— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 5, 2023
हे ही वाचा:
शेतांत आग लावण्यास विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यालाच राब जाळायला लावले!
महिला सैनिकांसाठी केंद्र सरकारची भेट!
माझ्या डोळ्यादेखत मुलानं मुख्यमंत्री व्हावं, अजित पवार यांच्या मातोश्रींची इच्छा!
इस्रायलच्या सैन्यांच्या श्वानांचा क्रूर हल्ला; हमासचे दहशतवादी ठार!
विराटने वनडे क्रिकेटमध्ये १३ हजारपेक्षा अधिक धावा केलेल्या आहेत. सचिनच्या खात्यात १८ हजार धावा आहेत. विराटने आपल्या या शतकी खेळीनंतर प्रतिक्रिया दिली की, भारतासाठी खेळण्याची प्रत्येक संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. माझ्या वाढदिवशी आपल्या चाहत्यांसमोर ही कामगिरी करता आली हे विशेष. लहान असताना जी स्वप्ने पाहिली होती ती पूर्ण होत आहेत. हे क्षण माझ्या आयुष्यात आले त्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. यापुढेही मी भारताच्या संघासाठी आपले योगदान देत राहीनच.
सहाव्य षटकात विराट मैदानात उतरला. शुभमन गिल बाद झाला होता. तेव्हा भारताची स्थिती २ बाद ९३ अशी होती.