टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. साऊथ आफ्रिका विरुद्धची मालिका २-१ अशा फरकाने गमावल्यानंतर कोहलीचा हा राजीनामा समोर आला आहे. आपल्या समाज माध्यमांवरील खात्यांवर आपण कर्णधारपद सोडत असल्याचे कोहलीने सांगितले आहे.
काय म्हणालाय विराट कोहली?
कोहलीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरील संदेशात असे म्हटले आहे की, “भारतीय संघाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी सात वर्ष मेहनत केली. मी माझे काम अतिशय प्रामाणिकपणे केले आणि त्यात कोणतीही कसर सोडली नाही. पण प्रत्येक गोष्टीत केव्हा ना केव्हा थांबावे लागते. माझ्यासाठी कसोटी क्रिकेटचा कर्णधार म्हणून ती वेळ आज आली आहे. या प्रवासात अनेक चढ आणि काही उतार आले. पण या प्रवासात कधीच प्रयत्नात किंवा विश्वासात कमी पडलो नाही. मी नेहमी जे केले त्यात कायम माझे १२०% देण्यावर विश्वास ठेवला आणि जर मी ती गोष्ट करू शकत नसेल तर ते योग्य नाही. माझ्या मनात या विषयी अतिशय स्पष्टता असून मी माझ्या संघासोबत अप्रामाणिक राहू शकत नाही.” असे कोहलीने आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हटले आहे
हे ही वाचा:
पहिल्या तीन महिन्यात जाहिरातींसाठी राज्य सरकार खर्च करणार १६ कोटी
मुंबई महापालिकेत जाधव, चहल, वेलारसु यांची ‘वाझेगिरी
किरण मानेंची हकालपट्टी व्यावसायिक कारणांमुळेच
प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; शेलारांची मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती
रवी शास्त्री आणि एम. एस. धोनीचे मानले विशेष आभार
विराट कोहलीने आपल्या या संदेशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे आभार मानले आहेत. देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल विराटने बीसीसीआयचे आभार मानले आहेत. तर सोबतच संघातील सर्व सहकाऱ्यांचेही त्याने आभार मानले आहेत. या आपल्या संदेशात त्याने भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा विशेष उल्लेख केला आहे. “रवी शास्त्री आणि त्यांचा संपूर्ण चमू हा वाहनाच्या मागे असलेल्या इंजिना प्रमाणे आमच्या सोबत होता” असे विराटने म्हटले आहे. तर महेंद्रसिंग धोनी याने माझ्यावर कर्णधार म्हणून विश्वास दाखवला आणि भारतीय क्रिकेट पुढे नेण्यासाठी मी एक सक्षम खेळाडू आहे असे त्याला वाटले यासाठी त्याचे विशेष आभार असे विराटने म्हटले आहे.
— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022