भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली याने मुंबईमध्ये रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील जुहू येथे एक आलिशान बंगला असून या बंगल्याचे रुपांतर रेस्टॉरंटमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
बॉलीवूडचे दिवंगत गायक किशोर कुमार यांचा मुंबईतील जुहू येथे एक आलिशान बंगला आहे. विराट कोहलीने त्यांच्या बंगल्याचे रेस्टॉरंटमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीने हा बंगला पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतला आहे. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
रेस्टॉरंटचे काम वेगाने सुरू असून याचे काम पूर्ण होत आले आहे. पुढील महिन्यापासून ते सुरू होऊ शकते. अमित कुमार हा किशोर कुमार यांचा मोठा मुलगा असून अमित सुद्धा पार्श्वगायक, अभिनेता आणि संगीत दिग्दर्शक आहे.
विराटचे दिल्लीतही एक रेस्टॉरंट आहे. २०१७ मध्ये त्याने दिल्लीत पहिले रेस्टॉरंट सुरू केले. त्यानंतर दिल्लीतच दुसरे रेस्टॉरंट सुरू असून विराटचा WROGN नावाचा कपड्यांचा ब्रँड देखील आहे.
हे ही वाचा:
बॅनरला विरोध केला म्हणून मनसे कार्यकर्त्याची महिलेला धक्काबु्क्की
मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात
इस्रायल सीरियामध्ये युद्धाचे ढग
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही मुंबईत काही वर्षांपूर्वी रेस्टॉरन्ट सुरू केले होते. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचेही कोलकात्यात रेस्टॉरन्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोहलीच्या रेस्टॉरन्टबद्दल उत्सुकता वाढली आहे