आयपीएल २०२४ ला शुक्रवारपासून सुरुवात झाली. यंदाच्या मोसमातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे संघ आमनेसामने आले होते. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीवीर रचिन रवींद्रने सर्वाधिक धावा केल्या. रचिन रवींद्रने १५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने विस्फोटक ३७ धावांची तुफानी खेळी केली. यानंतर रचिन रविंद्रला करण शर्माने तंबूचा रस्ता दाखवला.
विराट कोहली सोशल मीडियावर व्हायरल…
मात्र चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीवीर रचिन रवींद्र बाद झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा खेळाडू विराट कोहली वेगाने व्हायरल होत आहे. खरं तर या व्हायरल व्हिडीओमध्ये विराट कोहली ज्या प्रकारे रचिन रवींद्र बाद झाल्याचा जल्लोष साजरा करत आहे, तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया युजर्स सातत्याने कमेंट करत आपली प्रतिक्रिया देत आहेत.
हेही वाचा :
टीएमसीच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या संबंधित ठिकाणांवर सीबीआयकडून धाडसत्र
दिवाळे गावातील मच्छिमार बांधवांना नुकसान भरपाई द्या
मुइज्जूनी गुडघे टेकले; आर्थिक चणचणीमुळे मालदीवने भारतासमोर पसरले हात
‘गरज पडल्यास तुरुंगातून सरकार चालवेन’
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पहिल्या सामन्यात पराभव
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १७३ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्सकडून अनुज रावतने २५ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. याशिवाय दिनेश कार्तिकने २६ चेंडूत ३८ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या १७३ धावांच्या प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने १८.४ षटकात ४ बाद १७६ धावा करत सामना जिंकला. चेन्नई सुपर किंग्जकडून रचिन रवींद्रने सर्वाधिक ३७ धावा केल्या. तर शिवम दुबे २८ चेंडूत ३४ धावा करून नाबाद परतला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून कॅमेरून ग्रीन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कॅमेरून ग्रीनने २ फलंदाजांना बाद केले. याशिवाय यश दयाल आणि करण शर्मा यांना १-१ यश मिळाले.