23 C
Mumbai
Saturday, November 30, 2024
घरविशेषविराट कोहलीची रिंकू सिंगला बॅट भेट

विराट कोहलीची रिंकू सिंगला बॅट भेट

Google News Follow

Related

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात २९ मार्च रोजी झालेल्या सामन्यात कोलकाताने बेंगळुरूचा ७ गडी राखून सहज पराभव केला आहे. यासह केकेआर आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आला आहे. या सामन्यात विराट कोहलीने ५९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ८३ धावा केल्या. या सामन्यानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये विराट कोहलीने केकेआरचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंगला आपली बॅट भेट दिली आहे. आयपीएल २०२४ मधील घराबाहेर सामना जिंकणारा कोलकाता हा पहिला संघ ठरला आहे.

सामना संपल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि यादरम्यान केकेआरचे खेळाडूही आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. आरसीबीने आपल्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रशिक्षक अँडी फ्लॉवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या मधोमध एक क्लिपही दाखवण्यात आली होती. ज्यात विराट कोहलीने रिंकू सिंगला आपली बॅट गिफ्ट केली आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली.

हेही वाचा :

एनआयएकडून आठ टीएमसी नेत्यांना समन्स

अतिकनंतर मुख्तार अन्सारीचाही तुरुंगात मृत्यू; दोघांमध्ये गुन्ह्यांचेही साम्य आणि मृत्यूतही

इस्रायलला दोन हजारांहून अधिक बॉम्ब, २५ एफ-३५ लढाऊ विमाने देण्यास अमेरिकेची मंजुरी

काँग्रेसला दणका; आयकर विभागाकडून आणखी दोन नोटीस

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचे खेळाडू संघर्ष करत होते. दुसऱ्या टोकाकडून सातत्याने विकेट्स पडत होत्या, पण विराट कोहलीने क्रीजवर टीकून ५९ चेंडूत ८३ धावा करत आपल्या संघाला १८२ धावांपर्यंत नेले. आयपीएल २०२४ मध्ये कोहलीचे हे सलग दुसरे अर्धशतक होते. परंतु संथ खेळीबद्दल लोक त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत. फिल सॉल्टच्या ३० धावा, सुनील नारायणच्या ४७ धावा, व्यंकटेश अय्यरचे अर्धशतक आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या ३९ धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने १९ चेंडू शिल्लक असताना ७ गडी राखून सामना जिंकला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
202,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा