भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दाम्पत्याच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यांनी दुसऱ्या बाळाला जन्म दिला असून त्याचे नाव अकाय असे ठेवले आहे. मंगळवारी, २० फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर त्यांनी याबाबतची घोषणा केली.
कोहली आणि अनुष्का या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर दोघांना १५ फेब्रुवारी रोजी मुलगा झाल्याची घोषणा केली. मात्र त्याचवेळी त्यांनी सर्वांना त्यांचे खासगी आयुष्य जपू द्यावे, असे आवाहनही केले आहे. ‘मोठ्या आनंदाने आम्हाला सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या लहान मुलाचे अकाय आणि वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले. आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. मात्र आमच्या खासगी आयुष्याचा आदर करा,’ असे आवाहन त्यांनी सोशल मीडियावर केले आहे.
हे ही वाचा:
राम मंदिरात दरमहा कोट्यवधी रुपयांची देणगी, मोजणीसाठी ‘हायटेक मशिन्स’चा वापर!
इसिसला भाजपा कार्यालये आणि हिंदू नेत्यांना करायचे होते लक्ष्य
राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा ब्रेक के बाद
अनुष्का आणि विराट कोहली यांचा विवाह सन २०१७मध्ये झाला होता. तर, त्यांची मुलगी वामिकाने ११ जानेवारी २०२४ रोजी तिचा तिसरा वाढदिवस साजरा केला. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने सुरुवातीला त्याच्या यूट्यूब चॅनलवर, कोहली आणि अनुष्का यांना दुसरे बाळ होणार असल्याचे सांगितले होते. तथापि, काही दिवसांनंतर, कोहलीने इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेतून ‘ब्रेक’ का घेतला, हे मला माहीत नाही, असा खुलासा त्याने केला होता.
अकायचा अर्थ काय?
अकाय हे तुर्किश मूळ असलेले हिंदी नाव आहे. त्याचा अर्थ संपूर्ण चंद्राचा मिळणारा प्रकाश असा होतो. तर, संस्कृत भाषेनुसार याचा अर्थ ‘अमर’ किंवा ‘न क्षय झालेला’ असा होतो.