बेंगळुरूचा कोलकात्यावर ‘विराट’ विजय

विराटची ५९ धावांची खेळी

बेंगळुरूचा कोलकात्यावर ‘विराट’ विजय

ईडन गार्डन्सवर शनिवारी झालेल्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ विकेटने पराभव केला.

या सामन्यात आरसीबीसाठी माजी कर्णधार विराट कोहलीने ५९ धावांची शानदार खेळी केली. विराटने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ३ मोठे षटकार लगावले.

त्याचसोबत फिल साल्टनेही दमदार खेळी केली. केकेआरने दिलेल्या १७५ धावांचा पाठलाग करताना विराट आणि साल्टने शानदार सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे आरसीबीच्या विजयाचा मजबूत पाया रचला गेला. मात्र, ९५ धावांवर फिल साल्ट बाद झाला.

साल्टने केलेल्या ९५ धावात ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. साल्ट बाद झाल्यानंतर विराटने खेळाची सूत्रे सांभाळली.

कर्णधार रजत पाटीदारची तुफानी खेळी

आरसीबीच्या नव्या कर्णधार रजत पाटीदारनेही आक्रमक फलंदाजी करत फक्त १६ चेंडूत ३४ धावा ठोकल्या, ज्यात ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

१७  व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लियाम लिविंगस्टोनने चौकार मारत आरसीबीला यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला. यासह, आरसीबीने गुणतालिकेत २ गुणांसह आपले खाते उघडले.

हे ही वाचा:

३९७७ जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा, मालेगाव महापालिकेचे उप निबंधक अब्दुल तवाब यांना अटक!

कर्नाटक: ४०० वर्षे राज्य केले मग मुस्लिमांना सूट का?

समीर वानखेडे यांची एण्ट्री सालियन प्रकरणाला देणार नवे वळण

सुशांत सिंगची आत्महत्याच; रिया चक्रवर्तीला क्लीन चीट

केकेआरची सुरुवात दमदार

आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरसाठी पहिल्या षटकातच क्विंटन डी कॉक बाद झाला, जोश हेजलवूडच्या चेंडूवर तो बाद झाला.

त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे (५६) आणि सुनील नरेनने आक्रमक फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली.

१० षटकांनंतर केकेआरचा स्कोअर १ बाद १०७ धावा होता आणि संघ २०० धावांकडे वाटचाल करत होता. मात्र, रहाणे आणि नरेन लवकरच बाद झाल्यावर आरसीबीच्या गोलंदाजांनी संपूर्ण खेळावर वर्चस्व मिळवले.

Exit mobile version