ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ‘विराट’ दर्शन; चक्क हिंदी आणि पंजाबीत

भारतीय क्रिकेटपटूंवर विशेष लेख; हिंदी आणि पंजाबीमध्ये बातम्यांचे मथळे

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ‘विराट’ दर्शन; चक्क हिंदी आणि पंजाबीत

ऑस्ट्रेलियात बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीसाठी स्पर्धा रंगणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये दाखल झाला आहे. क्रिकेट विश्वातील महत्त्वाची मानली जाणारी स्पर्धा म्हणजे बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीकडे पाहिले जाते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांनी भारतीय संघाच्या आगमनाची ठळकपणे दखल घेतली आहे. वृत्तपत्रांनी हिंदी आणि पंजाबीमध्ये बातम्यांचे मथळे लिहून पहिल्या पानावर बातम्या दिल्या आहेत. शिवाय विराट कोहलीचे पूर्ण पानाचे पोस्टरही काही ठिकाणी दिसत आहे.

क्रिकेटमधील विराट कोहलीच्या अफाट लोकप्रियतेला आणि आगामी कसोटी मालिकेच्या महत्त्वाला सर्वच वृत्तपत्रांनी अधोरेखित केले आहे. बॉर्डर- गावसकर ट्रॉफीचे पाच कसोटी सामने कसे होतील याविषयीचे विशेष स्तंभही अनेक वृत्तपत्रांनी दिले आहेत. यामध्ये फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांच्या कामगिरीचीही दखल घेण्यात आली आहे. पहिल्या पानावर युगों की लडाई असा हिंदी भाषेतील मथळाही देण्यात आला आहे. तर एका लेखात युवा भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल याच्या लेखाला ‘नवा किंग’ असा मथळा देण्यात आला आहे. बॉर्डर- गावस्कर मालिकेसाठी भारताचा फलंदाज विराट कोहली पर्थला पोहोचला आहे.

ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतीय खेळाडूंची घेतलेली दखल सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. भारतीय चाहत्यांनी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर कोहलीचा चेहरा असलेली छायाचित्रे शेअर केली आहेत. यावरील एका पेपरवर म्हटले आहे की, युगों की लडाई.

हे ही वाचा : 

ट्रम्प यांचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्ज भारतासाठी ठरणार फायद्याचे!

शाहरुख खानला धमकावल्या प्रकरणी फैजान खानला अटक

बांगलादेशी मुलींना हिंदू नावाने आधारकार्ड, ईडीची झारखंड, प. बंगालमध्ये छापे

नवी मुंबईमधील रो-हाऊसमधून पोलिसांच्या हाती लागले अडीच कोटींचे घबाड

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना हा २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी भारतीय क्रिकेट संघ पर्थमध्ये दाखल झाला आहे. आता गोपनीयतेची काळजी घेण्यासाठी भारतीय संघाची सराव सत्रे बंद दाराआड आयोजित केली जाणार आहेत. दरम्यान, बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीत कमबॅक करण्याचे मोठे आव्हान विराट कोहलीसमोर असणार आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक राहिली होती. मागील सात वर्षांतील त्याच्या धावांची सरासरी निच्चांकी नोंदली गेली आहे. त्याने या मालिकेत केवळ ९३ धावा केल्या.

Exit mobile version