विराट-अनुष्का स्थायिक होणार लंडनमध्ये

त्याचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी दिली माहिती

विराट-अनुष्का स्थायिक होणार लंडनमध्ये

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आपली पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी याला दुजोरा दिला आहे.दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार यांनी ही माहिती दिली.

सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा आणि आपले खासगी आयुष्य मोकळेपणाने जगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र भारतात आपल्याला असे मोकळेपणाने वावरता येत नाही, असे मत विराटने मागे व्यक्त केले होते. मागे दोन महिने लंडनला असताना हे खासगी आयुष्य मुक्तपणे जगता आले होते, असा अनुभव विराटने व्यक्त केला होता. त्यामुळे तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. तिथे आपल्याला कुणीही ओळखणारे नाही, आपल्या मागे फोटो काढणारे धावत नाहीत त्यामुळे आपल्याला, मुलांना मोकळीक मिळते, असेही त्याचे मत आहे. त्यातून त्याने हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,’अजित दादा तुम्ही एक दिवस जरूर मुख्यमंत्री व्हा

एकनाथ शिंदेंचे नमस्ते सदा वत्सले… घरगड्याला वांत्या..

“मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतो”

अमोल कीर्तीकरांना न्यायालयाचा दणका; रवींद्र वायकारांची खासदारकी कायम!

राजकुमार म्हणाले की, विराट अनुष्का आपली मुले वामीका आणि अकाय यांच्यासोबत लवकरच लंडनला स्थायिक होतील.
आयपीएल दरम्यान विराटने याविषयीचे संकेत दिले होते. आपले क्रिकेट संपले की एक मोठा विराम घेण्याचा विचार असल्याचे त्याने म्हटले होते.

शिवाय, विराट आणि अनुष्का यांनी व्यवसायातही उडी घेतलेली आहे. ब्रिटनमधील एक व्यवस्थापन सल्लागार कंपनी त्यांनी विकत घेतली आहे. त्यात ते स्वतःला गुंतवून घेणार असल्याचे कळते. विराटच्या दुसऱ्या मुलाचा जन्मही लंडनला झाला होता. त्यावरून तो तिथे राहण्यास अधिक अनुकूल असल्याचे म्हटले जात होते.
सध्या विराट भारत ऑस्ट्रेलिया यांच्या कसोटी मालिकेत खेळत आहे.

Exit mobile version