रेल्वेसंबंधी व्हायरल व्हिडीओ दिशाभूल करणारे

आरसीटीसीकडून स्पष्टीकरण

रेल्वेसंबंधी व्हायरल व्हिडीओ दिशाभूल करणारे

मंगळवारी भारतीय रेल्वेच्या प्रवक्त्याने सोशल मीडियावर फिरत असलेल्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. नवीन रेल्वे ई-तिकीट बुकिंग नियमांनुसार, इतरांसाठी तिकीट बुक करण्यावर नवीन निर्बंध लादले गेले आहेत आणि वेगवेगळ्या आडनावांच्या प्रवाशांसाठी तिकीट बुक करण्यासाठी लोकांना तुरुंगात टाकले जाईल, असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र रेल्वे प्रवक्त्याने हे दावे फेटाळून लावले आहेत. ‘वेगवेगळ्या आडनावांमुळे ई-तिकीट बुक करण्यावरील निर्बंधांबद्दल सोशल मीडियावर प्रसारित होणारी बातमी खोटी आणि दिशाभूल करणारी आहे,’ असे आयआरसीटीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

इतरांसाठी आयआरसीटीसी तिकिटे बुक करण्यावर नवीन निर्बंध लादण्यात आले आहेत आणि वैयक्तिक आयआरसीटी आयडीद्वारे इतरांसाठी रेल्वे तिकीट बुक केल्याने तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते, असा खोटा दावा काहींनी केल्यानंतर हे सर्व सुरू झाले.

दिल्लीब्रेकिंग्ज डॉट कॉमने याबाबतचे वृत्त दिले होते. रेल्वे कायद्याच्या कलम १४३ नुसार, केवळ अधिकृतपणे नियुक्त केलेल्या एजंटांनाच तृतीय पक्षांसाठी बुकिंग करण्याचा अधिकार आहे. तसेच, समान आडनाव नियम नमूद करण्यात आला आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये संभाव्य तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो, असे वृत्त दिले होते. नवीन नियमानुसार व्यक्ती वैयक्तिक आयडी वापरून केवळ रक्ताच्या नात्यासाठी किंवा समान आडनाव असलेल्यांसाठी तिकीट बुक करू शकतात, असे आदेश दिल्याचेही यात नमूद होते. मित्र किंवा इतरांसाठी बुकिंग केल्यास १० हजार रुपयांपर्यंतचा मोठा दंड किंवा तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असा दावा वृत्तात करण्यात आला होता. त्यानंतर अनेक ‘एक्स’ वापरकर्त्यांनी हे वृत्त शेअर करण्यास सुरुवात केली. त्यांच्यापैकी अनेकांनी त्यात आणखी दिशाभूल करणारे दावे आणि भारतीय रेल्वेवर खोटे आरोप केले. भारतीय रेल्वेने खोटे दावे फेटाळल्यानंतर काही वापरकर्त्यांनी त्यांच्या पोस्ट हटवल्या.

बऱ्याच वापरकर्त्यांनी चिंता व्यक्त केली की, बऱ्याच प्रकरणांमध्ये, लग्नानंतर, अनेक स्त्रिया त्यांचे पहिले आडनाव कायम ठेवतात. जर बातमी खरी ठरली, तर जोडीदाराने आपल्या जोडीदारासाठी तिकीट बुक करणे गुन्हेगारी ठरू शकते, असा दावाही काहींनी केला.

मात्र भारतीय रेल्वेच्या प्रवक्त्याने खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला. वेगवेगळ्या आडनावांमुळे ई-तिकीटांच्या बुकिंगवर निर्बंध येण्याबाबतचे दावे ‘खोटे आणि दिशाभूल करणारे’ असल्याचे ठासून सांगितले. रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आयआरसीटीसी साइटवरून तिकिटे बुक केली जात असल्याचे स्पष्ट केले. आयआरसीटीसी वापरकर्ते मित्र, कुटुंब आणि नातेवाइकांसाठी त्यांच्या वापरकर्ता आयडीवरून तिकिटे बुक करू शकतात. प्रवाशाचे आडनाव काहीही असले तरीही तिकिटे बूक केली जाऊ शकतात. एक वापरकर्ता दरमहा १२ तिकिटे बुक करू शकतो जे आधारद्वारे योग्य प्रमाणीकरणाच्या बाबतीत दरमहा २४ पर्यंत जाऊ शकते, असेही आयआरसीटीसीने नमूद केले आहे.

तथापि, वैयक्तिक वापरकर्ता आयडीवरील तिकिटांची ‘व्यावसायिक विक्री’ हा गुन्हा असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. आडनाव काहीही असले तरी वापरकर्ते इतरांसाठी तिकिटे बुक करू शकतात. मात्र आर्थिक लाभासाठी त्यांच्या आयडीवर बुक केलेली तिकिटे विकणे हा गुन्हा आहे.

हे ही वाचा:

पवार, ठाकरे, जरांगेंचे गलिच्छ राजकारण चालू देणार नाही!

गावबंदीची उठाठेव कशाला? ओबीसींचे आंदोलन ‘जरांगे’ मार्गाने जायला नको…

केजरीवालांचा मुक्काम तिहारमध्येचं; जामीन देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द!

“के सुरेश यांना नामनिर्देशित करणं हा काँग्रेसचा एकतर्फी निर्णय”

प्रसिद्धी पत्रकात याबाबतीतील नियम नमूद करण्यात आले आहेत.

१. वैयक्तिक वापरकर्ता त्याच्या आयडीवर मित्र, कुटुंब आणि नातेवाइकांसाठी तिकीट बुक करू शकतात.

२. दर महिन्याला १२ पर्यंत तिकिटे बुक केली जाऊ शकतात. तिकिटावरील प्रवाशांपैकी एक जरी आधार-प्रमाणीकृत असेल तर, तिकिटांची संख्या दर महिन्याला २४पर्यंत जाऊ शकते.

३. वैयक्तिक वापरकर्ता आयडीवर बुक केलेली तिकिटे व्यावसायिक विक्रीसाठी नसतात आणि असे कृत्य रेल्वे कायदा १९८९च्या कलम १४३अंतर्गत गुन्हा आहे.

Exit mobile version