तब्बल एक तास ‘तो’ गाणार चक्क पाण्याखाली…वाचा, कशासाठी होतोय हा प्रयोग

तब्बल एक तास ‘तो’ गाणार चक्क पाण्याखाली…वाचा, कशासाठी होतोय हा प्रयोग

तब्बल पाच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ हा पुरस्कार आपल्या नावे असणारे विराग मधुमालती आता नवीन अनोखा प्रयोग करण्याच्या तयारीत आहेत.

विराग हे जगात पहिल्यांदा घडणाऱ्या पाण्याखालील गायनाच्या कार्यक्रमातून अवयवदानाचा संदेश देणार आहेत. विराग यांनी यापूर्वी तब्बल १०० दिवस डोळ्यांवर पट्टी बांधून १०० पेक्षा अधिक नेत्रदान जागरुकता मोहीमा राबवल्या आहेत. तब्बल पाच वेळा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये आपल्या विक्रमांची नोंद घेऊन त्यांनी भारताचे नाव मोठे केले आहे.

इंजिनिअरींगसोबत संगीत विद्या शिकलेले विराग हे अवयव दानाचा संदेश देण्यासाठी या अनोख्या प्रयोगातून एकाच वेळी अनेक जोखीमा उचलणार आहेत. या अनोख्या प्रयोगात आरोग्यास धोका असूनदेखील २० नोव्हेंबर २०२१ रोजी आपल्या अंगावर ६० किलो वजन चढवून पाण्याखाली जाणे, अंगावरील वजनासहित ताल आणि सुरानुसार श्वासाचा समतोल राखणे, पाण्याखाली असणाऱ्या माश्यांमुळे विचलित न होता तब्बल एक तास पाण्याखाली गाणे अशी अनेक कामे ते एकाच वेळी करणार आहेत.

ही वाचा:

… आणि सायबर पोलिसांनी शोधल्या शेकडो गहाळ वस्तू

… म्हणून ठाण्यात भरले खड्ड्यांचे प्रदर्शन!

अमित शहा पहिल्या सहकार संमेलनात काय बोलणार? बारामतीचे विशेष लक्ष

भारताशी संबंध दृढ करण्यातच अमेरिका आणि फ्रान्सचे हित

या अनोख्या मैफिलीचा कार्यक्रम ऑनलाईन होणार असून या कार्यक्रमाचा आस्वाद जगभरातील लोकांना घरबसल्या घेता येणार आहे. सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम आणि कॉमेडी किंग सुनील पाल यांचा स्टेज परफॉर्मन्स यात असणार आहेत.

‘हा अनोखा सोहळा जितका मनोरंजक आहे, तेवढाच जोखमीचा आहे. अवयवदानाबाबत संदेश देताना मी कोणतीही जोखीम उचलायला तयार आहे,’ अशी प्रतिक्रिया विराग यांनी दिली. अवयवदानाचा पवित्र संदेश एका अफलातून पद्धतीने देण्याच्या विराग यांच्या प्रयोगात सामील होणार असल्याचे गायिका साधना सरगम यांनी सांगितले. ‘विराग हे सामाजिक प्रबोधनासाठी हटके मार्ग निवडतात. त्यांच्या या वेगळ्या प्रयोगाचा एक भाग झाल्याचा आनंद आहे,’ असे सुनील पाल यांनी सांगितले.

Exit mobile version