24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेष'सावरकरांना अभिप्रेत असलेले परराष्ट्र धोरण आपण अवलंबिले'

‘सावरकरांना अभिप्रेत असलेले परराष्ट्र धोरण आपण अवलंबिले’

Google News Follow

Related

उदय माहुरकर, चिरायू पंडित यांच्या ‘वीर सावरकर’ पुस्तकाचे प्रकाशन

भारताने जेव्हा जेव्हा बोटचेपी भूमिका ठेवली तेव्हा तेव्हा आपला आत्मविश्वास गमावला आणि भूभागही गमावला. स्वातंत्र्याच्यावेळी पाकिस्तानला भूभाग दिला आणि नंतर चीनलाही भूभाग दिला. मात्र पहिल्यांदा भारताने डोकलाममध्ये आपले धोरण बदलले आणि प्रथमच भारताने आपले परराष्ट्र धोरण जे अवलंबिले ते सावरकरांना अभिप्रेत असणारे धोरण होते, ती कृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तेथे पाहाता आली, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि श्री चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या VEER SAVARKAR THE MAN WHO COULD HAVE PREVENTED PARTION या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणूून बोलत होते. मुंबईतील सावरकर स्मारकाच्या वास्तुत हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. त्यावेळी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, भाजपानेते आणि माजी मंत्री आशिष शेलार, मुंबई भाजपाचे प्रभारी व आमदार अतुल भातखळकर हे देखील या समारंभाला उपस्थित होते.

आपल्या भाषणात पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, भारताने चीनला रोखण्याचे काम केले त्याचा परिणाम म्हणजे ज्या चीनला आपण घाबरत होतो, त्या ठिकाणी आता चीनला घाबरावे लागले. तेथून चीनला परत जावे लागले. हिंदी-चिनी भाई भाई हीच नीती ठेवली असती किंवा आम्हाला काय करायचे असे म्हटले असते तर त्याठिकाणी धोरणात्मक रस्ता चीनने कायम केला असता आणि त्यानंतर चीनला कधी थांबवू शकलो नसतो. प्रथमच भारताने आपले परराष्ट्र धोरण जे अवलंबिले ते सावरकरांना अभिप्रेत असणारे धोरण होते, ती कृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तेथे पाहाता आली.

काँग्रेसच्या बोटचेप्या धोरणामुळे, लांगुलचालनामुळे आणि कधीही प्रश्नाला थेट सामोरे न जाण्याच्या वृत्तीमुळे त्यांचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत हा प्रथम सांगण्यात आला मग तो रुजविण्यात आला आणि मग १९४७ ला तो प्रत्यक्ष अंमलात आणण्यात आला. सावरकर हे सर्व लोकांपुढे मांडत होते. आणि ते सत्य लोकांपुढे जाऊ नये म्हणून सतत विविध आरोपाने सावरकरांना आरोपित ठेवायचे असे धोरण पहिल्या दिवसापासून काँग्रेसने ठेवले ते आजपर्यंत आहे. त्याच धोरणावर काँग्रेस चालत आहे. पण सावरकरांचे विचार इतके तेज:पुंज आहेत, की ते झाकता येण्यासारखे नाहीत. त्यामुळे सातत्याने कोणी ना कोणी विचाराने प्रेरित होऊन समाजापुढे ते आणीत राहील ते काम या पुस्तकाच्या माध्यमातून करीत वस्तुस्थिती मांडली गेली आहे. हे पुस्तक कल्पित नाही तर त्या त्या काळातील विचार, माहिती, घटना यांच्या उदाहरणातून ते दाखवण्याचा प्रयत्न यात केला गेला आहे.

काँग्रेस नेते मनिष तिवारी यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले, त्यांनी त्यात सत्य सांगितले की २६/११ च्या हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा विचार झाला पण तेव्हाच्या नेतृत्त्वात क्षमता नव्हती. जर तेव्हा तो निर्णय घेतला गेला असता, तर नंतर ज्या बॉम्बस्फोटाच्या मालिका घडल्या त्या टाळता आल्या असत्या, असेही फडणवीस यांनी सांगितले.

भारतीय सैन्यात ती ताकद नक्कीच आहे, मात्र भारतीय सैन्याला राजकीय पाठबळ कधी मिळाले नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्यापूर्वी पुस्तकाचे लेखक आणि केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर पुस्तक लेखनामधील विविध ऐतिहासिक बाजू, घटना याची माहिती दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान नेमके काय आहे, हे सांगताना त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेसंबंधातील त्यांचे दृष्टिकोन हे अधिक महत्त्वाचे असल्यावर अधिक भर दिला. ते राष्ट्रीय सुरक्षेचे पितामह आहेत, हा महत्त्वाचा भाग या पुस्तकातून मांडला आहे. त्याचप्रमाणे भारताची फाळणी रोखण्याचे प्रयत्न सावरकरांनी सर्वतोपरी केले, ते कोणाला माहिती नसल्याचे सांगत ते माहुरकर यांनी सांगितले की, त्यांनी या संबंधात केलेल्या विविध कामांना या पुस्तकात स्पष्ट केले.

फाळणीमागे मुस्लीम लीगचा जातीय प्रचार, काँग्रेसचे मुस्लीमविषयक लांगूलचालन आणि तिसरे कारण म्हणजे काँग्रेसचा सिद्धांत… या सिद्धांताबाबत अधिक स्पष्टीकरण देताना माहुरकर यांनी सांगितले की, काँग्रेसचा असणारा सिद्धांत पूर्ण चुकीचा होता, असे अरिफ मोहम्मद खान यांनी काल शनिवारी कोचीनमध्ये या पुस्तकाबाबत चर्चा करताना सांगितले. खान म्हणाले होते की, काँग्रेसचे सिद्धात सर्व चुकीचे होते विशेष म्हणजे संपूर्ण अहिंसेचा सिद्धात पूर्ण चुकीचा होता. माहुरकर यांनी यावेळी पुस्तक लिखाणामागील प्रेरणा, त्यामागील दृष्टिकोन याचीही माहिती दिली.

पुन्हा फाळणी टाळावयाची असेल तर या पुस्तकात दिसलेले सावरकर लोकांपुढे समोर आणावे लागतील. या अर्थाने ते खरे राष्ट्रनायक आहे. आजपर्यंत राष्ट्रपिता आपण पाहिला यानंतरचे दिवस हे राष्ट्रनायकाचे असतील, हे सांगणारा आजचा क्षण आहे, असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी प्रास्ताविक भाषणात काढले.

चिरायू पंडित म्हणाले की, स्वातंत्र्याचा आणि विभाजनाचीही ही ७५ वर्षे होत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यानंतर दंग्यांच्यावेळी सांगितले होते,की ही लढाई हिंदू मुसलमानांमध्ये नाही तर ही लढाई हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधीलही ही लढाई नाही तर ही लढाई अखंड हिंदुस्थान आणि अखंड पाकिस्तामधील आहे. याच संदर्भामध्ये आज पूर्ण विचार करावा लागेल, नवीन पिढीपुढे असणारे धोके लक्षात घेऊन हे पुस्तक आम्ही म्हणूनच नव्या पिढीलाही लक्षात घेऊन तयार केले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी सांगितले की, या पुस्तकाचे नाव वीर सावरकर द मॅन हू कुड हॅव प्रीव्हेंन्टेड पार्टिशन असे आहे, जी फाळणी मागे झाली. सावरकर ते टाळू शकले नाहीत. ती पुन्हा होऊ नये. तशी स्थिती येऊ नये यासाठी हे पुस्तक वाचून इतिहास अभ्यासण्याची गरज आहे. याचे कारण तुमचे तारणहार तुम्हीच असाल, हे हिंदु समाज लक्षात घेईल, तो दिवस भाग्याचा असेल, असे ते म्हणाले.

 

हे ही वाचा:

‘उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला आणि हिरवा हातात घेतला’

पीटरसनने का मानले पंतप्रधान मोदींचे आभार?

पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ

ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर; काँग्रेसला दूर ठेवणार

 

प्रकाशन समारंभाच्या सुरवातीला पुस्तकाबद्दलची माहिती देणारी ध्वनिचित्रफित प्रदर्शित करण्यात आली. मुग्धा वैशंंपायन यांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गीत सादर केले. कार्यक्रमाच्या अखेरीस श्रोत्यांच्या प्रश्नांना चिरायू पंडित यांनी उत्तरे दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा