नाशिकमधील भगूर या ठिकाणी जन्मलेल्या स्वातंत्र सेनानी आणि सुधारक विनायक दामोदार सावरकर यांची आज १४१ जयंती.देशभरातील अनेक लोकांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केलं जात आहे.दरम्यान, अभिनेता रणदीप हुड्डा याने देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केलं आहे.सावरकरांच्या आयुष्यावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा काही दिवसांआधीच रिलीज झाला होता.ज्यामध्ये अभिनेता रणदीप हुड्डानं प्रमुख भुमिका साकारली होती.लोकांनी चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आणि अभिनेता रणदीप हुड्डाचे कौतुकही केलं.सावरकरांच्या जयंतीनिमित्त अभिनेता रणदीप हुड्डा आपल्या पत्नीसह सेल्युलर जेलला भेट देऊन सावरकरांना अभिवादन केलं आहे.
यानंतर रणदीप हुड्डाने माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले की, वीर सावरकरांची कथा वाचल्यानंतर मी त्यांच्यासारखे आयुष्य जगण्याचा आणि ते मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला.हे मांडताना माझा त्यातला सहभाग खूप वाढला आहे.त्यांचे मर्म समजून घेणाऱ्या लोकांकडून माझं कौतुक होतं तेव्हा खूप छान वाटते. आज आम्ही इथे सेल्युलर जेलमध्ये आलो आहोत, जिथे सावरकरांना ५० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सर्व शक्तिशाली क्रांतिकारकांना इंग्रजांनी देशापासून दूर एकांतात ठेवले होते आणि हे ठिकाण आहे”.तसेच चित्रपटात काम करताना आलेल्या अनुभवाचा उल्लेख अभिनेत्याने केला.
हे ही वाचा:
केजरीवालांना दणका, जामीन मुदतवाढ अर्जावर सुनावणीस नकार
“पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या अस्तित्वाची लढाई”
मांसमच्छीच्या दुकानांमुळे सोकावलेल्या कुत्र्यांनी केला मुलीवर हल्ला, मुलीचा मृत्यू!
९० एकर जमीन बळकावून शेख शाहजहानने २६१ कोटी रुपये कमावले!
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा २२ मार्च रोजी रिलीज झाला होता.या सिनेमात रणदीप हुड्डानं सावरकरांची प्रमुख भुमिका साकारली आहे. तर अभिनेत्री अंकिता लोखंडे हिनं त्यांची पत्नी यमुना बाई यांची भुमिका साकारली आहे.