स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंनी शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुयश मिळवले आहे. त्या स्पर्धेत सावरकर बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंनी ११ सुवर्णपदके आणि ३ रौप्य पदके पटकावली आहेत.
धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये २६ ते २९ डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजित केलेल्या डीएसओ बॉक्सिंग टुर्नामेंटमध्ये आदित्य गुप्ता, अवंतिका केवट, जागृती बोथ, रिया सुतार, सोनल गुप्ता, मार्दवी भोसले, गुरुराज चुटके, कौशल केवट, दर्पण साळुंके, साहिल कुंचीकोरवे, अमोल दुलगज यांनी सुवर्ण पदक मिळवले. तसेच आदिती सुर्वे, दर्शना पाटील आणि रुजुला महाराव यांनी रौप्य पदक मिळवले.
हे ही वाचा:
क्राइम पेट्रोलमध्ये विकृत ‘आफताब’ दाखवला हिंदू
काय पंचकर्म, काय योगासनं, शहाजी बापू पाटलांच वजन एकदम ओक्के
राजौरीमध्ये हत्याकांडानंतर दहशतवाद्यांचा आयईडी स्फोट
मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय योग्य
या स्पर्धांमधील सर्व सुवर्णपदक विजेते आता पालघर जिल्ह्यात होणाऱ्या डीएसओ डिव्हिजन बॉक्सिंग टुर्नामेंटध्ये सहभागी होतील, अशी माहिती सावरकर बॉक्सिंग क्लबचे प्रशिक्षक राजन जोथाडी यांनी दिली आहे.