श्रावण महिन्यात हजारो भाविक त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येत असतात. यंदा श्रावणात अधिक मासदेखील आल्याने मास महिन्यात भाविक धार्मिक कार्य करत असतात. त्यातच शनिवार-रविवार सुट्ट्या आणि श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी होत आहे. त्यातच व्हीआयपी दर्शनामुळे भाविकांना त्याचा फटका बसत होता. सामान्य भाविकांच्या वेळेची बचत व्हावी याकरता बारा ज्योतिर्लिंगापैकी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे व्हीआयपी दर्शन शनिवार, १२ ऑगस्टपासून ते १५ सप्टेंबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. भाविकांना त्र्यंबकेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी सहा ते आठ तासांचा अवधी लागत आहे. व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य भाविकांना त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनासाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागत होते. सामान्य भाविकांना दर्शनासाठी लागणारा वेळ पाहता, त्यांच्या वेळेत बचत होण्याकरता व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय त्र्यंबकेश्वर देवस्थानने घेतला आहे.
हेही वाचा :
भाजपा नेत्या सना खान हत्येप्रकरणी आरोपीला अटक
जया प्रदा यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास, पाच हजारांचा दंड; काय आहे प्रकरण?
श्रीनगर एअरबेसवर मिग- २९ लढाऊ विमानांचा स्क्वॉड्रन तैनात
सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटनाला चालना देणार
सामान्य भाविक हजारो रुपये खर्च करून, कामातून वेळ काढून एकच आस्था ठेवून त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी त्र्यंबकला येतो. दर्शनासाठी, सहा ते आठ तास मोठ्या श्रद्धेने रांगेत उभे राहतो. मात्र, चार ते पाच सेकंदात गर्भगृहाच्या आत गेल्यावर तेथील सिक्युरीटी बाजूला करतो.
लवकर दर्शन व्हावे यासाठी २०० रुपये देणारेही असतात. असे त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी दररोज २० हजारांहून भाविक दर्शनसाठी येत असतात. त्यातच व्हीआयपी दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांमुळे अडचणीत सापडतात. या दर्शन रांगेत वयोवृद्ध आणि लहान मुलांचाही समावेश असतो. त्यांना भूक-तहान लागणे यांचा सामना करावा लागतो. याची दखल घेऊन मंदिर ट्रस्ट विश्वस्तांनी भाविकांसाठी रांगेत पाण्याची बाटली, बिस्कीट पुडे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. दर्शन झाल्यानंतर राजगिरा लाडूचे वाटपही करण्यात येणार आहे.