मणिपूरमध्ये गेल्या वर्षीपासून उसळलेल्या हिंसाचारादरम्यान शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या सरकारी बंगल्याजवळ आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. ही आग मुख्यमंत्र्यांच्या सरकारी बंगल्याजवळील एका इमारतीला लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी एका तासातच आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची सुरक्षाव्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. या दुर्घटनेत कोणतेही नुकसान झाले नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
माजी आयएएस अधिकाऱ्याच्या कुटुंबाची इमारत
ही इमारत गोव्याचे माजी मुख्य सचिव दिवंगत आयएएस अधिकारी टी. किपगेन यांच्या कुटुंबाची आहे. गेल्यावर्षी मणिपूरमध्ये हिंसाचार उसळल्यापासून ही इमारत रिकामी आहे.
हे ही वाचा..
दक्षिण गाझामध्ये लष्करी कारवाईदरम्यान आठ इस्रायली सैनिक ठार
पाऊस आला धाऊन सामना गेला वाहून! भारताचा गटसाखळीतील शेवटचा सामना रद्द
निवडणूक होताच काँग्रेसचा खरा चेहरा उघड; कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या करात वाढ
उत्तराखंडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातात १० हून अधिक भाविकांचा मृत्यू
आतापर्यंत २१९ जण मृत्युमुखी
३ मे, २०२३ रोजी कुकी आणि मैतेई समुदायाच्या दरम्यान जातीय संघर्ष उसळल्यानंतर मणिपूर सातत्याने हिंसाचाराच्या आगीत होरपळतो आहे. या हिंसाचारात आत्तापर्यंत २१९हून जण मृत्युमुखी पडले आहेत.