बहराइच नंतर राजस्थानच्या भिलवाडा येथे जातीय हिंसाचाराची आणखी एक घटना घडली. तिथे फटाके फोडल्याबद्दल एका व्यक्तीवर चाकूने वार करण्यात आला आणि इतर अनेकांवर ‘विशेष समुदायाच्या’ लोकांनी हल्ला केला. भाजप नेता आणि त्याच्या पुतण्यासह पीडितांवर हिंसक जमावाने हल्ला केला आणि चाकूने वार केले. भीलवाडा शहरातील भीमगंज पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे.
या परिसरात पार्षद मंजू देवी यांचे पती देवेंद्र हाडा भीमगंज पोलीस स्टेशनजवळ चहाचे दुकान चालवतात. गुरुवारी सायंकाळी उशिरा तो काही तरुणांसह त्याच्या दुकानाबाहेर फटाके फोडत होता. त्यावेळी एका समाजातील सुमारे ३०-४० लोक घटनास्थळी आले आणि त्यांनी फटाके फोडण्यास हरकत घेतली.
हेही वाचा..
बांगलादेशमध्ये सनातन जागरण मंचची भव्य रॅली
महायुती अमित ठाकरेंना समर्थन देणार?
इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण, सीरिया, इराकचे हवाई क्षेत्र बंद!
सचिन वाझेला दणका; माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज फेटाळला
याबद्दल देवेंद्र हाडा म्हणाले की, दिवाळीच्या आधी ते फटाके फोडत आहेत. हे ऐकून एका तरुणाने चाकू काढून त्याच्यावर पोटात वार करत त्याच्यावर हल्ला केला. जेव्हा हिंदू बाजूच्या इतरांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हांडा यांच्या पुतण्यासह त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
त्यानंतर जमावाने दुकानाची तोडफोड केली. दगडफेक केली आणि जवळपास उभ्या असलेल्या तीन वाहनांची जाळपोळ केली. या घटनेनंतर हिंदू समाजाचे लोक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली. या चकमकीदरम्यान काही लोकांनी दगडफेक केली आणि शेजारी उभी असलेली काही वाहने जाळली. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
देवेंद्र हाडा यांच्यावर ३-४ वार करण्यात आले, तर इतरांना हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली. त्यांना इतर दोन जखमींसह महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबद्दल बोलताना एसपी धर्मेंद्र सिंह म्हणाले, रात्री १०.३० च्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की एमजी हॉस्पिटलजवळील टेम्पो स्टँडवर फटाके फोडण्यावरून वाद झाला. वारही झाले. चाकूच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत.
एएसपी पारस जैन म्हणाले, पार्षदांच्या पतीचे चहाचे दुकान आहे. तिथल्या काही लोकांशी त्यांची बाचाबाची झाली. आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींची पोलिसांनी रात्री परेड काढली. सगळ्या तरुणांना पोलिसांनी यथेच्छ चोप दिला होता. त्यांचे पाय प्लॅस्टरमध्ये गुंडाळल्याचे व्हीडिओत दिसते आहे. त्यांना लंगडत लंगडतच पोलिसांनी त्या परिसरात फिरवले.
सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली. याशिवाय ३१ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. लोकांचा पोलिसांवर विश्वास निर्माण व्हावा यासाठी पोलिसांनी शुक्रवारी शहरातील चार अटक तरुणांची परेड काढली.