बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतीय कांद्याला फटका, सीमेवर शेकडो ट्रक ठप्प !

शेतकऱ्यांना कोट्यवधीचा फटका

बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतीय कांद्याला फटका, सीमेवर शेकडो ट्रक ठप्प !

बांगलादेशातील हिंसाचारामुळे भारतातील कांद्याला मोठा फटका बसला आहे. बांगलादेशातील अराजकतेमुळे भारताने सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे भारत बांगलादेश सीमेवर कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच बांग्लादेशमध्ये ५० हजार टन कांद्याच्या निर्यातीसाठी परवानगी दिली होती. दरम्यान, सीमेवर शेकडो ट्रक अडकल्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधीचा फटका बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधून दररोज ५० ते ६० कांद्याचे ट्रक बांगलादेशकडे रवाना होतात. परंतु, सीमा बंद झाल्यामुळे कांद्याचे ट्रक तेथेच अडकले आहेत. यामुळे कोट्यवधीचे व्यवहार ठप्प झाले असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करतो. अशामुळे शेतमाल निर्यातीवर याचा परिणाम होत आहे. सीमा सुरु होण्यासाठी अजून सहा दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कदाचित यामध्ये वाढ देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत देशांतर्गत कांद्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा..

बांगलादेशात संतप्त जमावाने प्रसिद्ध अभिनेत्यासह वडिलांची मारहाण करत केली हत्या !

धक्कादायक! विनेशचे १०० ग्रॅम वजन अधिक, ऑलिम्पिकमधून अपात्र

बांगलादेशात आंदोलकांकडून अवामी लीग पार्टीच्या २० नेत्यांची हत्या

डॉ. दातार यांना यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार

दरम्यान, बांगलादेशातील परिस्थिती अजूनही हाताबाहेर आहे. देशातील अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. संपूर्ण देशाचा ताबा लष्कराने घेतला असून लवकरच अंतरिम सरकार स्थापन करण्यात येणार आहे.

Exit mobile version