पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारी विनेश फोगाट केवळ १०० ग्रॅम वजनामुळे अपात्र ठरली होती. अपात्र ठरल्यानंतर विनेशने निवृत्ती जाहीर केल्याने देशवासीयांना मोठा धक्का बसला आहे. तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी विनेशला चॅम्पियन ठरवत मोठी घोषणा केली आहे. सैनी म्हणाले की, विनेश हरियाणात परतल्यावर रौप्यपदक विजेत्याप्रमाणे तिचे स्वागत केले जाईल. याशिवाय हरियाणा सरकार विनेशला ४ कोटी रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हरियाणाचे सीएम नायब सिंग सैनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, ‘आमची हरियाणाची शूर मुलगी विनेश फोगाट हिने जबरदस्त कामगिरी करून ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. काही कारणांमुळे ती ऑलिम्पिकची अंतिम फेरी खेळू शकली नसली तरी ती आपल्या सर्वांसाठी चॅम्पियन आहे. आमच्या सरकारने ठरवले आहे की, विनेश फोगाटचे पदक विजेत्याप्रमाणे स्वागत आणि सत्कार करण्यात येईल. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्याला हरियाणा सरकार जे सर्व सन्मान, बक्षिसे आणि सुविधा देते ते विनेश फोगाटला कृतज्ञतेने दिले जाईल. आम्हाला तुझा अभिमान आहे विनेश, असे मुख्यमंत्र्यांनी पोस्टमध्ये लिहिले.
हे ही वाचा:
दादर रेल्वे स्थानकावर सापडलेल्या सुटकेसमधील मृतदेहाचे गूढ उकलले !
कुस्तीपटू अंतिम पंघाल अडचणीत; शिस्तभंगाचा आरोप करत पॅरिस सोडण्याचे आदेश
बांगलादेशी भारतात घुसत होते, सीमासुरक्षा दलांनी रोखले
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ७० औषधे होणार स्वस्त
दरम्यान, हरियाणा सरकारकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना ६ कोटी रुपये, रौप्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना ४ कोटी रुपये आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना २. ५ कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. विनेश फोगाटने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते, त्यामुळे हरियाणा सरकार तिला ४ कोटी रुपये देणार आहे. तसेच पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एलपीयू) चे संस्थापक आणि राज्यसभा खासदार अशोक कुमार मित्तल यांनी विनेशला विजेता घोषित केले असून २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
हरियाणा की हमारी बहादुर बेटी विनेश फौगाट ने ज़बरदस्त प्रदर्शन करके ओलंपिक में फाइनल में प्रवेश किया था। किन्हीं भी कारणों से वो भले ही ओलंपिक का फाइनल नहीं खेल पाई हो लेकिन हम सबके लिए वो एक चैंपियन है।
हमारी सरकार ने ये फैसला किया है कि विनेश फौगाट का स्वागत और अभिनंदन एक…
— Nayab Saini (@NayabSainiBJP) August 8, 2024