महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने कुस्तीला अलविदा करत कुस्तीतून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एक्स’वर भावनिक पोस्ट करत विनेश फोगाट हिने कुस्तीला रामराम ठोकला आहे. विनेश फोगाटने ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्य फेरीचा सामना ५-० अशा मोठ्या फरकाने जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली. शिवाय अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. परंतु, अंतिम सामन्यापूर्वी शंभर ग्राम वजन जास्त झाल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले. यानंतर भारताची पदकाची संधी हुकली शिवाय सर्वत्र हळहळही व्यक्त करण्यात येत होती. अशातच आता विनेश हिने निवृत्ती जाहीर केल्याने भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
“आई, कुस्ती माझ्याकडून जिंकली, मी हरली, माफ करा, तुमचे स्वप्न, माझे धैर्य सर्व तुटले आहे. माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती…” असे लिहित विनेश फोगाट हिने देशवासियांची माफी मागितली आहे आणि म्हटले आहे की मी तुमच्या सर्वांची नेहमीच ऋणी राहीन.
माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके इससे ज़्यादा ताक़त नहीं रही अब।
अलविदा कुश्ती 2001-2024 🙏
आप सबकी हमेशा ऋणी रहूँगी माफी 🙏🙏
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) August 7, 2024
हे ही वाचा:
विनेश फोगाटसाठी कोणताही नियमांचा अपवाद नाही…तिला रौप्य दिले जाऊ शकत नाही…
बांग्लादेशात कम्युनिस्ट नेत्याची फासावर लटकवून हत्या !
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !
नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, पाच जणांचा मृत्यू !
ऑलिम्पिकच्या स्पर्धेत विनेश फोगाट हिने उपांत्य फेरीचा सामना ५-० च्या फरकानं जिंकला. अंतिम फेरीत धडक मारल्यावर भारताच्या खात्यात आणखी एक पदक येणार हे निश्चित असणार होते. विनेश फोगाट सुवर्ण पदक आणेलचं अशी खात्री भारतीयांना होती. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. पण, १०० ग्रॅम वजन पात्र ठरलं आणि विनेशला सुवर्ण पदकाच्या सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. यानंतर फोगाटसह भारतीयांमध्ये निराशा पसरली. कुस्तीपटू विनेश फोगाट हिचे ५० किलो गटात वजन सुमारे १०० ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले. विनेशला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, पण वजन जास्त असल्यानं अंतिम सामन्याच्या काही तास आधीच तिला अपात्र ठरवण्यात आलं.