भारताची कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. युक्रेनच्या ओक्साना लिवाच या खेळाडूचा पराभव करून विनेश फोगटने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सुरवातीला लिवाचने खूप प्रयत्न केले. पण शेवटी विनेशचा विजय झाला. फोगटने उपांत्यपूर्व सामना ७-५ असा जिंकला. आता तिचा उपांत्य फेरीचा सामना क्यूबा देशाच्या गुझमन लोपेझशी आज रात्री १०.१५ वाजता होणार आहे.
कुस्तीपटू विनेश फोगटने ५० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा पराभव करण्यापूर्वी तिने जपानच्या युई सुसाकीचा ३-२ अशा फरकाने पराभव केला होता. विशेष म्हणजे, युई सुसाकी हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आंतरराष्ट्रीय कुस्तीत जपानच्या कुस्तीपटूचा हा पहिलाच पराभव आहे, ज्यामुळे विनेशचे यश आणखीनच खास झाले आहे. विनेशने हा सामना ३-२ असा जिंकला.
हे ही वाचा:
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित !
बांगलादेशमध्ये आंदोलकांनी तुरुंग पेटवताचं ५०० कैद्यांसह अनेक दहशतवादी पळाले
न्यूयॉर्कमध्ये आंदोलकांचा बांगलादेशच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला
धर्मांतर करणाऱ्या ख्रिश्चन पाद्रीला रंगेहात पकडले !
दरम्यान, आता सर्वांच्या नजरा सेमीफायनलकडे लागल्या आहेत. आज रात्री १०.१५ हा सामना होणार आहे. विनेश फोगट विरुद्ध क्यूबा देशाच्या गुझमन लोपेझ असा सामना रंगणार आहे.