विनेश फोगटने अर्जुन, खेल रत्न पुरस्कार कर्तव्य पथावर सोडले!

पंतप्रधान कार्यालयात जाण्यापासून रोखले

विनेश फोगटने अर्जुन, खेल रत्न पुरस्कार कर्तव्य पथावर सोडले!

भारतीय कुस्ती महासंघावर संजय सिंह यांची नियुक्ती झाल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया याने त्याला मिळालेल्या पदकाचा कर्तव्य पथावर त्याग केला होता. आता आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजेती विनेश फोगट हिनेही महिला कुस्तीपटूंना मिळत असलेल्या वागणुकीच्या निषेधार्थ तिला मिळालेले अर्जुन पुरस्कार आणि खेल रत्न पुरस्काराचा त्याग केला आहे. तिने शनिवारी ही दोन्ही पदके कर्तव्यपथावरील पदपथावर सोडून दिली.

महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या बृजभूषण शरणसिंह यांच्याच निकटवर्तीयाची निवड कुस्तीमहासंघाच्या अध्यक्षपदी झाल्याने तसेच, अन्य काही घटनांच्या पार्श्वभूमीवर विनेश हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. विनेश फोगट हिला तिला मिळालेले पुरस्कार पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर ठेवण्याच्या प्रयत्नात होती. मात्र तिला पोलिसांनी रोखले. त्यानंतर तिने कर्तव्य पथावरील पदपथावर हे पुरस्कार सोडून दिले. महिला कुस्तीपटूंना न्याय मिळत नसल्याने निराशेतून आपण अर्जुन आणि खेल रत्न पुरस्कार परत करत आहोत, असे विनेश हिने पत्रात नमूद केले होते.

हे ही वाचा:

दहशतवादी हाफिज सईदच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान सरसावले!

नौदल अधिकाऱ्यांच्या वर्दीवर शिवमुद्रा; नवे स्कंधचिन्ह जाहीर!

‘इस्रायल-हमासचे युद्ध पंतप्रधान मोदीच थांबवू शकतात’

उत्तर मेक्सिकोमध्ये पार्टीत बंदुकधाऱ्यांच्या हल्ल्यात सहा ठार

‘मला मेजर ध्यान चंद खेल रत्न आणि अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. मात्र आता माझ्या जीवनात या पुरस्काराला काहीही अर्थ नाही. प्रत्येक महिलेला तिचे जीवन आदराने जगायचे असते. त्यामुळे पंतप्रधान महोदय, मला माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करायचा आहे, जेणेकरून सन्मानाने जगण्याच्या मार्गात हे पुरस्कार आपल्यावर ओझे बनू नयेत,’ असे तिने पत्रात नमूद केले होते.

Exit mobile version