फ्रान्समध्ये रंगात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतून मोठी बातमी समोर आली आहे. यात भारताला मोठा धक्का बसला असून पदकाची संधीही हुकली आहे. भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने ५० किलो फ्री स्टाइल गटात जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे भारताचे एक पदक निश्चित झाले होते. मात्र, विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आहे.
कुस्तीपटू विनेश फोगाट हिने यंदा ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली होती. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध ५- ० असा एकतर्फी विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. यामुळे विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली भारतीय ठरली. मात्र, अंतिम सामन्याआधीचं विनेश फोगाटसह भारताला एक धक्का बसला आहे.
विनेश फोगाट ही स्पर्धेत ५० किलो फ्री स्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र, तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याने अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता सुवर्ण आणि रौप्य पदकाची संधी हुकलेली विनेश फोगट रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही.
हे ही वाचा..
बांगलादेशात आंदोलकांकडून अवामी लीग पार्टीच्या २० नेत्यांची हत्या
डॉ. दातार यांना यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
बांगलादेशातील अंतरिम सरकारचे नेतृत्व करणारे मोहम्मद युनूस कोण आहेत?
ट्रम्प यांच्या हत्येच्या कटामागे इराणशी संबंधित पाकिस्तानी व्यक्ती?
माहितीनुसार, अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेश हिचे वजन मंगळवारी रात्री अंदाजे २ किलो जास्त होते. ती रात्रभर झोपली नव्हती आणि स्पर्धेचे निकष पूर्ण करण्यासाठी तिने जॉगिंगपासून स्किपिंग आणि सायकलिंगपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले पण ते अपुरे पडल्याने विनेशला आता अपात्र ठरवण्यात आले आहे.