आता विनेश फोगाटनेही खेलरत्न, अर्जुन पुरस्कार परत करण्याचा घेतला निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र

आता विनेश फोगाटनेही खेलरत्न, अर्जुन पुरस्कार परत करण्याचा घेतला निर्णय

Vinesh Phogat. File photo: IANS

कुस्तीगीर बजरंग पुनियाने त्याला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत केल्यानंतर आता त्याच्यासोबत ब्रृजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात आंदोलन करणारी कुस्तीगीर विनेश फोगाट हिनेदेखील पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. तिने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदीर्घ पत्र लिहून हे पुरस्कार परत करणार असल्याचे म्हटले आहे.

 

सोशल मीडियावर आपले हे पत्र प्रसिद्ध करत विनेशने आपल्या जीवनात या पुरस्काराला आता काही महत्त्व नाही, असे म्हटले आहे. प्रत्येक महिलेला सन्मानाने जगता आले पाहिजे. कुस्तीगीर साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बजरंगने पत्र लिहून आपण पद्मश्री परत करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने कर्तव्यपथवर जाऊन पद्मश्री पुरस्काराचे पदक ठेवून घरची वाट धरली. आता विनेशने हा निर्णय घेतला आहे.
विनेशने या पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधानजी मी आपल्या घरातील मुलगी विनेश आहे. आपल्यापर्यंत ही गोष्ट पोहोचलीस असेल की साक्षीने कुस्ती सोडली आणि बजरंगने पद्मश्री परत केला. मी सुद्धा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करणार आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात गुंतवणूक आली पण आदित्य ठाकरेंना नाही कळली !

जय श्रीराम: उत्तराखंडमधून १५०० रामभक्त येणार अयोध्येत!

आरबीआयसह ११ बँकांना उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल!

कटू आठवणी विसरून विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालाय सज्ज!

 

२०१६ साली साक्षी मलिकने ऑलिम्पिक पदक जिंकल्यावर बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेचे तिला ब्रँड अँबेसेडर बनविण्यात आले होते. पण आता त्याच साक्षीने कुस्ती सोडावी लागली आहे.
कुस्तीतील महिलांना जे भोगावे लागते आहे त्यावरून लक्षात येते की, त्या किती दुःख सहन करत आहेत. जो शोषणकर्ता आहे तो आपला दबदबा असल्याची भाषा करतो आहे. महिला पहिलवानांवर त्याने कशा टिप्पणी केल्या आहेत हे आपण एकदा ऐका, आमच्या प्रतिष्ठेचा बाधा पोहोचेल अशी विधाने केली.
बजरंगने ज्या परिस्थितीत पद्मश्री परत केला ते पाहून मला अतीव दुःख झाले. आता मला त्या पुरस्कारा घेतानाच्या छायाचित्रातून सुटका हवी आहे. या पुरस्कारांचे माझ्या आयुष्यात आता कोणतेही महत्त्व नाही. त्यामुळे मी माझे खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे.

Exit mobile version