शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

रविवार, १४ ऑगस्ट रोजी पहाटे विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. उपचाादरम्यान विनायक मेटे यांची प्राणज्योत मालवली.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवार, १४ ऑगस्ट रोजी पहाटे त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र, उपचाादरम्यान विनायक मेटे यांची प्राणज्योत मालवली.

विनायक मेटे यांच्या गाडीला आज पहाटे मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला. पहाटे सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गाडीला अपघात झाला. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती अशी माहिती समोर आली आहे. यानंतर विनायक मेटे यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विनायक मेटे हे अपघातात गंभीर जखमी झाले होते.

विनायक मेटे आणि त्यांचे सहकारी बीडहून मुंबईकडे येत होते. दरम्यान, उपचारादरम्यान विनायक मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.

हे ही वाचा:

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

धक्कादायक! जळगावमध्ये भावाकडून बहिणीसह प्रियकराची हत्या

समीर वानखेडेंना जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीनचीट

उमेश कोल्हे हत्या प्रकरणी NIA कडून दहाव्या आरोपीला अटक

विनायक मेटे यांच्याबद्दल थोडक्यात

शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात विनायक मेटे आमदार होते. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्यही होते. विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. मराठा आरक्षण आंदोलनातील मेटे हे प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी विनायक मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते.

Exit mobile version